खर्शी तर्फ कुडाळ येथील रक्तदान शिबिराला प्रतिसाद

सूर्यकांत जोशी कुडाळ :- रक्तदान हेच श्रेष्ठदान मानून कोरोना महामारी च्या काळात जिल्ह्यात रक्ताचा तूटवड़ा असल्याने आरोग्य विभागाच्या व सायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत जावली तालुक्यातील खर्शी तर्फ कुडाळ येथील युवकानी एकत्र येत सामाजिक कार्य हाती घेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
सामाजिक शैक्षणिक तसेच क्रीड़ा क्षेत्रात कायम अग्रेसर असलेल्या गावाने कोरोनाच्या काळात राजकीय गट तट बाजूला ठेवत रक्तदान करुण गरजू लोकांना मदतीचा हात दिला असून त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत जिल्हा रुग्णालयाच्या रक्त पेढ़ीचे प्रमुख डॉ. पद्माकर कदम यांनी व्यक्त केले
रक्तदान शिबिरात ३२ युवकानी रक्तदान करून सहकार्य केले,सोबतच येणाऱ्या काळात रक्ताची गरज भासल्यास रक्तदान शिबिर आयोजित करणार असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने पोलीस पाटील सुहास भोसले यांनी सांगितले, या शिबिरा करीता रणजीत शिंदे,संदीप किर्वे, डॉ. सुजित शिवणकर, निलेश शिवणकर, तुषार भोसले, प्रकाश सोनटक्के, जगन्नाथ शिवणकर, प्रकाश भोंडे,यांच्या सह ग्रामस्थ उपस्तिथ होते.यावेळी सातारा जिल्हा रुग्णालयातील सुरेश नड़े,स्वाती पवार ,सुप्रिया गायकवाड़ हे कर्मचारी उपस्तिथ होते,त्यांचे स्वागत लक्ष्मण भोसले यांनी केले तर आभार धैर्यशील भोसले यांनी मानले.