जावलीत करहरमध्ये कोरोनाचा प्रवेश
June 28, 2020/

जावलीत करहरमध्ये कोरोनाचा प्रवेश
सूर्यकांत जोशी कुडाळ- जावली* तालुक्यात रात्री उशिरा आलेल्या कोरोना पाँसिटीव्ह अहवालात रामवाडी येथील दहा जणांमध्ये करहर येथील एकाचा समावेश आहे. तालुक्यातील मोठ्या व बाजारपेठेच्या गावात प्रथमच शिरकाव झाला आहे.रामवाडी येथील नातेवाईकाच्या अंत्यविधीत सहभागी करहरचा पाहुणा बाधित झाला.
रात्रीच्या अहवालात 48 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, 11 वर्षाचा मुलगा, 22 वर्षीय महिला, 40 वर्षीय महिला, 16 वर्षीय युवक, 18 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष,तसेच धोंडेवाडी येथील 65 वर्षीय पुरुषाचा पुन्हा पाँसिटीव्ह अहवाल आला आहे.
दरम्यान रामवाडी , करहर व आखेगणी ही तीन गावे एकाच दिवशी कोरोना बाधित झाली आहेत. हा धोका अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे।
[the_ad id="4264"]