जावलीत आज आणखी सात जण कोरोना पाँसिटीव्ह.

जावलीत आज आणखी सात जण कोरोना पाँसिटीव्ह.
सूर्यकांत जोशी कुडाळ -जावली तालुक्यात शनिवारी एकाच दिवशी विविध चार गावातील तेरा कोरोना पाँसिटीव्ह रुग्ण आढळल्याने जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता या पाँसिटीव्ह रुग्णांच्या हायरिस्क काँन्टेक्ट मधील लोकांचे स्वाब घेतले असून किती जणांचा अहवाल पाँसिटीव्ह येणार, अजुन किती गावांना या लोकांच्या संपर्का मुळे कोरोना कवेत घेणार याबाबत रविवारी दिवसभर लोकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती.सर्वजण दिवसभर कोरोना अहवालाच्या प्रतिक्षेत होते.रात्री साडेनऊ वाजता आलेल्या अहवालात तालुक्यातील सात जणांचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आला आहे.4 रामवाडी ,2 आखेगनी
1 ,बिरामनेवाडी (खर्शी बारामूरे )
जावलीतील चार गावांना कन्टेमेंट झोन निर्बंध लागू – मिनाज मुल्ला
जावली तालुक्यातील रामवाडी, आखेगणी, करहर व धोंडेवाडी येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने या चार गावांना जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष शरद पाटील व गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्या संयुक्त अहवाला नुसार या चार गावांना प्रतिबंधित क्षेत्राचे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.