कोरोना रुग्णांची लक्षणे ओळखण्यात आशा/ अंगणवाडी सेविकांचे यश

रामवाडी व आखेगणी कोरोना रुग्णांची लक्षणे वेळीच ओळखण्यात आशा व अंगणवाडी सेविकांचे यश.
आशा व अंगणवाडी सेविकांना मिळणार प्रोत्साहन पर बक्षीस- सतीश बुद्धे
सूर्यकांत जोशी कुडाळ -आशा व अंगणवाडी सेविका सर्वे दरम्यान ऑक्सिमीटर मध्ये spo2 कमी आला म्हणून किंवा सौम्य लक्षणं चा रुग्ण आशा/अंगणवाडी सेविकेला लक्षात आले आणि त्यांनी दवाखान्यात पाठवले व तो रुग्ण पॉसिटीव्ह आला तर आशा /अंगणवाडी सेविके ला रु. २५०/- प्रोत्साहनपर बक्षीस मिळणार असल्याची माहिती जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.
रामवाडी व आखेगणी चा रुग्ण याच सर्वे करणार्यां सेविकांना सापडला आहे. हे या सर्वे चे यश आहे, हा सर्वे करणारे या बक्षिसासाठी पात्र ठरले आहेत.जावली तालुक्यात आशा व अंगणवाडी सेविकांचे काम कौतुकास्पद आहे.
. आशा / अंगणवाडी सेविकांनी दररोज मुंबई हुन तसेच अन्य जिल्ह्यातून आलेले कोरंटाईन व्यक्ती व इतर व्याधीग्रस्त व्यक्ती यांची spo2 तपासणी लक्षपूर्वक करावी.
व चांगले काम करणार्यांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी. सर्वे चा उद्देश सफल व्हावा. यासाठी प्रोत्साहन पर बक्षिसे योजना सुरू करण्यात आली आहे .असेही गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.