आज चौघांना डिस्चार्ज ;७२ जणांचे अहवाल प्रलंबित.

आज चौघांना डिस्चार्ज ;७२ जणांचे अहवाल प्रलंबित.
रामवाडीची कोरोना साखळी तोडण्याचे जावलीच्या प्रशासनापुढे मोठे आव्हान ;
आठ दिवसांत ३२ रुग्णांची भर
एकूण ११३, बळी ८ , कोरोना मुक्त ७१, ३४ अँक्टिव्ह
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील शिंदेवाडी येथील 39 वर्षीय महिला, म्हाते येथील 54 वर्षीय महिला व 62 वर्षीय पुरुष, केडांबे येथील 65 वर्षीय पुरुष हे चार जण कोरोना वर यशस्वी मात करुन घरी परतले आहेत. आज रात्री उशिरापर्यंत कोरोना अहवाल आले नाहीत. जावलीतील ७२ जणांचे अहवाल प्रलंबित असून आठ दिवसांत अचानक वाढलेल्या रुग्ण संख्येने लोक आता प्रत्येक दिवसाच्या अहवालाची प्रतिक्षा करत आहेत.
. बावीस जून ते एकोणतीस जून या आठ दिवसात जावली तालुक्यात ३२ कोरोना पाँझिटीव्ह रुग्णांची वाढ झाली. यामध्ये रामवाडी येथे अंत्यविधीसाठी एकत्रित आलेल्या विविध गावातील लोकांमुळे निर्माण होणारी साखळी तोडण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे.या आठवड्यात रामवाडी, आखेगणी,करहर, बिरामणेवाडी, बामणोली तर्फ कुडाळ या पाच गावांत कोरोनाने शिरकाव केला. तर धोंडेवाडी येथील जुना रुग्ण पुन्हा कोरोना पाँझिटीव्ह आला.
मुंबईसह बाहेरून येणाऱ्यांनी संयमाने राहणेची आवश्यकता
जावली तालुक्यात बहुतांश कोरोना पाँझिटीव्ह रुग्णांना मुंबई, पुणे ठाणे यासह बाहेरून आलेल्या प्रवासाचा संदर्भ आहे. व या लोकांच्या सहवासाने स्थानिकांना संसर्ग झाला आहे. केवळ आखेगणी येथील एका रुग्णाबाबत संसर्गाची माहिती मिळू शकलेली नाही. ही परिस्थिती पाहता मुंबईसह बाहेरून येणाऱ्यांनी संयमाने राहणेची आवश्यकता आहे. विलगीकरणाचे नियम काटेकोर नियम पाळा असे कळकळीचे आवाहन गाववाले करत आहेत .आनंदाच्या तसेच दु:खाच्या प्रसंगात भावनांना आवर घालणे आवश्यक आहे. सोशल डिस्टेन्सींग व मास्क वापर या गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत.तालुक्यातील सध्या वाढण्णारी कोरोना पाँसिटीव्ह रुग्ण संख्या बेजबाबदार पणा व मुंबई करांच्या फाजील आत्मविश्वासामुळे वाढल्याचे आता स्थानिक नागरिक बोलत आहेत.
एका चुकीमुळे संपूर्ण कुटुंब, गाव तसेच पै पाहुणे व आप्तेष्टांची गावे कोरोनाच्या रडारवर येत आहेत. शासनाने केलेले नियम व अटी या आपल्या हितासाठी आहेत. पन्नास लोकांपेक्षा कमी लोकांत लग्न सोहळा करणे तर अंत्यविधीत केवळ वीस लोक असावेत हे बंधन पाळणेच हितावह आहे.परंतु कायदा व नियम मोडला म्हणजे आपण फार शहाणे असाच काहीसा समज लोकांनी करून घेतल्याचा प्रत्यय अनेकदा पाहायला मिळतो.शासन गर्दी करु नका , मास्क वापरा असे वारंवार आवाहन करत आहे. पण गर्दीत मास्क न वापरणारा मीच जास्त शहाणा या अविर्भावात फिरत असतो.शुभेच्छा देण्यासाठी अथवा सांत्वन करण्यासाठी गळाभेट घेणे टाळले पाहिजे. त्यासाठी सोशल डिस्टेन्सींग आणि सोशल मिडियाचा वापर हा काळानुरुप बदल स्विकारला पाहिजे.
बामणोली तर्फ कुडाळच्या रुग्णांला कोरोनाची लक्षणे नाहीत
बामणोली तर्फ कुडाळ येथील कोरोना पाँसिटीव्ह अहवाल आलेल्या रुग्णाला आजाराची कोणतीही लक्षणे नाहीत. आठ दिवसांपूर्वी च्या मंगळवारी ठाणे पासुन सहप्रवासी असणारा कोरोना पाँसिटीव्ह आढळल्याने संशयित म्हणून बामणोलीच्या माल वहातुक एसटी बस चालकाचा स्वाब तपासण्यात आला असता त्याचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आला.दरम्यान या आठ दिवसांत संबंधित चालकाने कराड ते ठाणे व ठाणे ते बामणोली असा प्रवास केला .शनिवारी गावी आलेल्या या चालकाचा रविवारी स्वाब घेण्यात आला.व सोमवारी त्याचा कोरोना पाँसिटीव्ह अहवाल आला.या दरम्यानच्या संपर्कातील लोकांचा शोध प्रशासन व आरोग्य विभाग घेत आहे.आज निकट सहवासित अकरा लोकांचे संस्थात्मक विलगीकरण करुन स्वाब तपासणी साठी पाठवले आहेत.दरम्यान आज बामणोली गावाला तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका वैद्यकीय अधिकारी डाँ.भगवान मोहिते, डॉ. अनंत वेलकर, मंडलाधिकारी गाढवे,तलाठी जाधव यांनी भेट देऊन मार्गदर्शक सूचना केल्या.
रामवाडी येथील एकूण ५४ निकटसहवासातील लोकांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. ३१ जणांचे स्वाब तपासणी साठी पाठवण्यात आले होते पैकी २३ जणांचे अहवाल सोमवार पर्यंत कोरोना पाँसिटीव्ह आले आहेत.आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी तेवीस जणांचे स्वाब तपासणी साठी पाठवण्यात आले आहेत.करहर येथील सतरा जणांचे स्वाब तपासणी साठी पाठवले आहेत.याशिवाय आखेगणी १२, आखाडे ५, सनपाने ४,अशा एकूण ७२ जणांचे संस्थात्मक विलगीकरण करुन स्वाब तपासणी साठी पाठवले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी भगवानराव मोहिते यांनी दिली.
जावलीतील बामणोली तर्फ कुडाळ गावाला कन्टेमेंट झोनचे निर्बंध लागू – मिनाज मुल्ला
जावली तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने या गावाला जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष शरद पाटील व गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्या संयुक्त अहवाला नुसार बामणोली तर्फ कुडाळ या गावाला प्रतिबंधित क्षेत्राचे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.