जावलीवर विठुरायाची क्रपाद्रष्टी ; आजचे सर्व पंचवीस अहवाल निगेटिव्ह
July 1, 2020/

जावलीवर विठुरायाची क्रपाद्रष्टी; आजचे सर्व पंचवीस अहवाल निगेटिव्ह
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्याचे आराध्य दैवत असणाऱ्या प्रतिपंढरपूर परिसरावर कोरोनाचे मोठे संकट घोंगावत होते. परंतु तपासणी साठी पाठवलेल्या सर्व पंचवीस लोकांचे अहवाल आज निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे विठुरायाच पावला अशी प्रतिक्रिया देत संशयितां सह त्या गावातील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
रामवाडी, करहर व बामणोली तर्फ कुडाळ येथील पाँसिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सनपाने, आखाडे व बामणोली येथील हायरिस्क मधील पाठवलेल्या स्वाब पैकी पंचवीस लोकांचे अहवाल आज प्राप्त झाले असून ते सर्व निगेटिव्ह असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी दिली. उर्वरीत अहवाल उद्या पर्यंत प्राप्त होऊ शकतील असेही ते म्हणाले आहेत.
[the_ad id="4264"]