जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची जावलीत होणार कडक अंमलबजावणी

जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशाची जावली तालुक्यात कडक अंमलबजावणी
सूर्यकांत जोशी कुडाळ – कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मास्क न वापरणे व सोशल डिस्टंसिन्ग न पाळणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची जावली तालुक्यात कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शरद पाटील यांनी दिली आहे.
ग्राम दक्षता समित्यांनी अधिक सतर्क रहावे
जावली तालुक्यात गेल्या १० दिवसांत तब्बल ३४ कोरोना पाँसिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. तसेच हायरिस्क काँन्टेक्ट मधील अजुन ५४ संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत. ही वाढ अत्यंत गंभीर आहे.मुंबई, पुणे, ठाणे यासह पर जिल्हयातून येणाऱ्या लोकांची नोंद व आरोग्य तपासणी करून पंधरा दिवस सक्तीने होमक्वारंटाईन अथवा ग्रामस्तरीय विलगीकरण करावे.यापुढील काळात ग्राम दक्षता कमिट्यांनी अधिक सतर्क रहावे तसेच नियम न पाळणारांवर कडक कारवाई करावी अशी सूचना गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी केली आहे.
यापुढे ग्रामीण व शहरी भागात दुकानांमध्ये गर्दी झाल्यास दुकानदारावर कारवाई होणार आहे. तसेच मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिन्ग न पाळल्यास पाहिल्यावेळेस 500 रु. व दुसऱ्यांदा 1000 रु दंड आणि रायगाव येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती केली जाईल . प्रशासनाचे नियम व सूचना या लोकांच्या हितासाठीच आहेत.तरी नागरीकांनी आपल्यावर कारवाई होऊच नये यासाठी नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच शिस्तभंग केल्यास होणाऱ्या कार्यवाहीस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासना तर्फे करण्यात आले आहे.