जावलीत आज बारा जणांचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह

जावलीत आज बारा जणांचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह
जावली तालुका – एकूण १२६ , मुक्त ७१ ,बळी ८
सूर्यकांत जोशी कुडाळ – आज गुरुवारी रात्री आलेल्या अहवालात जावली तालुक्यातील बारा जणांचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आला आहे. या मध्ये करहर २, व रामवाडी १० यांचा समावेश आहे. अशीमाहिती जिल्हा शल्यचिकित्सक अमोल गडिकर यांच्या कडुन प्राप्त अहवालात नमूद आहे. रामवाडी एकूण ३३,
जून महिन्यात तब्बल ६९ रुग्णांची वाढ
लाँकडाऊन सुरु झाल्या पासून ३१ मे पर्यंत जावली तालुक्यात ४५ कोरोना पाँसिटीव्ह रुग्ण होते. व चार जणांचा बळी गेला होता.तर जून महिन्यात तब्बल ६९ रुग्णांची वाढ होऊन चार जणांचा बळी गेला. ३० जून अखेर कोरोना पाँसिटीव्ह रुग्ण एकूण ११४ झाले आहेत.आठ जणांचा कोरोनाने बळी गेला.जिल्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पहाता जावलीकरांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
अहवाल निगेटिव्ह आले तरीही काळजी घ्या
जावली तालुक्यातील पंचवीस संशयितांचे अहवाल बुधवारी निगेटिव्ह आल्यामुळे संशयितांसह सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे. सुरुवातीला निगेटीव्ह अहवाल आलेले पून्हा काही दिवसांनी पाँसिटीव्ह झालेची अनेक उदाहरणे आहेत.त्यामुळे या निकटसंबंधित संशयितांनी कोरंटाईन कालावधी काटेकोर पणे पाळणे गरजेचे आहे.
यापुढे ग्रामीण व शहरी भागात दुकानांमध्ये गर्दी झाल्यास दुकानदारावर कारवाई होणार आहे. तसेच मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिन्ग न पाळल्यास पाहिल्यावेळेस 500 रु. व दुसऱ्यांदा 1000 रु दंड आणि रायगाव येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती केली जाईल . प्रशासनाचे नियम व सूचना या लोकांच्या हितासाठीच आहेत.तरी नागरीकांनी आपल्यावर कारवाई होऊच नये यासाठी नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच शिस्तभंग केल्यास होणाऱ्या कार्यवाहीस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासना तर्फे करण्यात आले आहे.