जावलीत कोरोनाचा नववा बळी

जावली तील एका बाधिताचा मृत्यु
जावली कोरोना बळींची संख्या ९
सूर्यकांत जोशी कुडाळ – क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील मुंबई येथून प्रवास करुन आलेला जावली तालुक्यातील रामवाडी येथील 58 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. या रुग्णास मधुमेह व अतिउच्च रक्तदाबाचा त्रास होता अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
दरम्यान मेढा ग्रामीण रूग्णालयातील एका अधिपरिचारीकेचा कोरोना अहवाल पाँसिटीव्ह आल्याने खळबळ माजली आहे. या परिचारिकेची सातारा येथील कोव्हिड १९ सेंटर मधून मेढ्याला बदली करण्यात आली होती.या परिचारिकेच्या संपर्कात बुधवारी सहकारी आरोग्य कर्मचारी व अनेक अन्य पेशंट आले होते त्यांचा शोध प्रशासन घेत आहे.
जावली तालुक्यात कोरोना बळींचा आकडा नऊ वर पोहचला आहे.एकूण १२७, बळी ९, डिस्चार्ज ७०,अँक्टिव्ह ४८.