Skip to content

बिभवी गावातील तरुणांकडून कृषी दिना निमित्त बीजगोळ्यांचे रोपण

बातमी शेयर करा :-


स्टुडंट लीडरशिप डेव्हलपमेंट चा जावळी तालुक्यात उपक्रम

सूर्यकांत जोशी कुडाळ- लीडरशिप डेव्हलपमेंट कॅम्प चे रजत नवले यांचे मार्गदर्शनाखाली बिभवी गावलगतच्या डोंगरात गावातील तरुणांना घेऊन जवळपास पाच हजार फळझाडांच्या बिया सीडबॉल्स पद्धतीने रोपण करुन कृषी दिन साजरा केला त्या त्यामुळे आगामी वर्षभरात हा डोंगर संपूर्ण हिरवागार पाहायला मिळणार आहे युवकांनी राबवलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे

” सिडबॉल्स ” ही संकल्पना पक्ष्यांच्यामार्फ़त आपल्यापर्येंत पोहचली आहे पक्षी जे फळ खातात त्या फळाच्या बिया त्यांच्या विष्टे मार्फ़त डोंगरात रानात पडल्या जातात आणि तिथून झाडांची नवनिर्मिती होते हीच संकल्पना आपण सुद्धा वापरली सीडबॉल्स हे माती आणि शेण एकत्र करून त्याचे गोळे बनवले जातात आणि त्यामध्ये झाडाची बी ठेवतो आणि डोंगरांमध्ये फेकून देतो पाऊस पडल्यावर त्यातून झाडे उगवली जातात
स्टुडंट लीडरशिप डेव्हलपमेंट चे रजत नवले आणि बिभवी गावचे तरुण स्वयंसेवकानीं कृषी दिनाचे औचित्य साधून १ जुलै ला 5000 सीड बॉल्स फेकले यामध्ये विराज देशमुख ,वरूण देशमुख , अर्पित देशमुख, कुणाल नवले, ऋषिकेश देशमुख, रणजित देशमुख , अभिजित देशमुख, आकाश देशमुख ,अक्षय वाघ , अखिल नलावडे , निखिल नलावडे आदींनी परिश्रम घेतले

ग्लोबल वॉर्मिंग पासून निसर्गाचे संवर्धन होणे गरजेचे आहे त्यासाठी अधिकाधिक झाडे लावण्यावर भर देणे गरजेचे असुन तरुणांमध्ये या जागृती होणे काळाची गरज असल्याचे मत रजत नवले यांनी व्यक्त केले.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!