जावलीत कोरोनाचा नववा बळी; सुदैवाने आज नवीन बाधित नाही

शुक्रवारी कोणाचाही अहवाल पाँसिटीव्ह नाही. मात्र जावली तालुक्यातील एका कोरोना बाधिताचा मृत्युने हादरा
बळींची संख्या ९, रामवाडी ३३/१
सूर्यकांत जोशी कुडाळ-शुक्रवारी जावली तालुक्यात नव्याने कोणाचाही कोरोना अहवाल पाँसिटीव्ह आला नाही.तीघांचे स्वाब तपासणी साठी पाठवले होते पण ते निगेटीव्ह आले आहेत अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे. दरम्यान,क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील मुंबई येथून प्रवास करुन आलेला जावली तालुक्यातील रामवाडी येथील 58 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.या रुग्णास मधुमेह व अतिउच्च रक्तदाबाचा त्रास होता अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे. जेमतेम पाचशे लोकसंख्या असणाऱ्या रामवाडीत गुरुवार पर्यंत कोरोना बाधितांची संख्या ३३ झाली असून एका कोरोना बाधिताचा बळी गेला आहे.
मेढा ग्रामीण रुग्णालयच क्वारंटाईन
दरम्यान मेढा ग्रामीण रूग्णालयातील एका अधिपरिचारीकेचा कोरोना अहवाल पाँसिटीव्ह आल्याने खळबळ माजली आहे. या परिचारिकेची सातारा येथील कोव्हिड १९ सेंटर मधून मेढ्याला बदली करण्यात आली होती.या परिचारिकेच्या संपर्कात सोमवार ते बुधवार पर्यंत सहकारी आरोग्य कर्मचारी व अनेक अन्य पेशंट आले होते त्यांचा शोध प्रशासन घेत आहे.दरम्यान ग्रामीण रुग्णालयात तीन दिवस बंद ठेवण्यात आले आहे.
जावली तालुक्यात कोरोना बळींचा एकूण आकडा नऊ वर पोहचला आहे.गुरुवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात मुनावळे येथील ल ४२ वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आला आहे.एकूण कोरोना बाधित १२८, बळी ९, डिस्चार्ज ७०,अँक्टिव्ह ४९. अशी गुरुवार अखेर पर्यंत ची आकडेवारी आहे.
जावलीतील मुनावळे गावाला कन्टेमेंट झोनचे निर्बंध लागू – मिनाज मुल्ला
जावली तालुक्यातील मुनावळे येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने या गावाला जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष शरद पाटील व गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्या संयुक्त अहवाला नुसार मुनावळे या गावाला प्रतिबंधित क्षेत्राचे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.
बेंदुर सणावर कोरोनाचे सावट
शनिवारी होत असलेल्या बेंदुर सणावरही कोरोनाचे सावट आहे. बेंदुर हा शेतकऱ्यांचा वर्षाचा सण आहे. यादिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या जीवा शिवाच्या बैलजोडीचे रंगरंगोटी सजावट करुन पूजन करत असतो. पूरण पोळाचा घास भरवून गावातून सवाद्य मिरवणूक काढली जाते. परंतू राज्यात कोणतेही सण उत्सव साजरे करण्यास बंदी आहे. असे तहसीलदार शरदपाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसेच बैलांचे पूजन शेतकऱ्यांनी घरीच करावे.परंतु बैलांच्या मिरवणुका काढू नयेत असे आवाहन पोलिसांनी केले आहे.