Skip to content

कुडाळचे तिघे एकवर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार

बातमी शेयर करा :-

कुडाळचे तिघेजण एक वर्षासाठी हद्दपार

जिल्हा पोलीस अधिक्षकांची कारवाई

 सूर्यकांत जोशी कुडाळ – दारूची अवैध विक्री आणि बेकायदेशीर जुगार चालवणाऱ्या टोळीतील कुडाळच्या तिघांना एक वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिला असल्याची माहिती मेढा पोलिस ठाण्याचे सपोनि निळकंठ राठोड यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे दिली आहे.

          दीपक शामराव वारागडे वय  ४५ – टोळी प्रमुख,सुनील गोविंद गावडे वय ३२ – सदस्य, प्रवीण रामचंद्र वारागडे वय -४४  सदस्य   या तिघांवर चोरटी दारूची विक्री व अवैध जुगार व्वसायाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तरीही यांचे  हे अवैध व्यवसाय सुरुच असल्याने मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि निळकंठ राठोड, पोलीस हवालदार संजय शिर्के, पोलीस काँन्टेबल संजय काळे यांनी नमूद टोळी हद्दपार करण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडे सादर केला होता.त्यानुसार जिल्हा पोलीस अधिक्षकांनी नमूद टोळीतील तिघांना एक वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपारीचा आदेश जारी केला आहे .त्यानुसार सदर कारवाई  वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टीके, सपोनि निळकंठ राठोड, पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे,पो.हवालदार संजय शिर्के, सूर्यकांत शिंदे,संजय काळे,इम्रान मेटकरी यांनी केली आहे.

         दरम्यान पोलिसांनी केलेल्या या कारवाई बद्दल समाजाच्या विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

 अभागी भगिनींच्या आत्म्याला शांती – विलासबाबा जवळ

            रस्त्यावर जळताना तडफडून प्राण सोडलेल्या एका अभागी भगिनीच्या आत्म्याला आज थोडी तरी नक्की शांती मिळेल अशी प्रतिक्रिया जावली तालुका दारुबंदी महिला समिती व महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्त संघाच्या वतीने विलासबाबा जवळ यांनी व्यक्त करून पोलीसांचे अभिनंदन केले आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!