आजचा रात्रीचा कोरोना अहवाल अद्याप प्राप्त नाही

शनिवारी रात्री साडेदहा पर्यंत कोरोना अहवाल प्राप्त नाही.
बेंदुर सण बैलांच्या मिरवणूकी शिवाय साजरा
सूर्यकांत जोशी कुडाळ – दररोज रात्री च्या कोरोना अहवालाची वाट सर्वजणच पाहत असतात. परंतु आज रात्रीचा अहवाल साडेदहा वाजेपर्यंत तरी आलेला नाही.त्यामुळे उद्या सकाळ पर्यंत नवीन काही घडामोडींची वाट पहावी लागणार आहे.
दरम्यान महाराष्ट्रात शेतकरी वर्गात बेंदुर सणाचे विषेश महत्त्व आहे.यांत्रिकी पद्धतीने शेतातील अनेक कामे होत असल्याने बैलांची जागा ट्रँक्टर ने घेतली आहे.आता गावा गावात मोजक्याच बैल जोड्या शिल्लक आहेत.पारंपरिक पद्धती नुसार बळीराजा ने आपल्या सर्जाराजांना स्वच्छ धुवुन रंगवले , सजवले व पूजा करुन पुरणपोळीचा गोष्ड नैवद्य खाऊ घातला. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मिरवणुका न काढण्यात चे आदेश दिल्याने बैलजोड्यांची गावातून मिरणूक काढली नाही. त्यामुळे बळीराजाच्या उत्साहावर मर्यादाच आल्या।.
एकूण कोरोना बाधित १२८, बळी ९, डिस्चार्ज ७०,अँक्टिव्ह ४९.