Skip to content

जावली शिवसेनेच्या वतीने पुनवडी ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप.

बातमी शेयर करा :-

कोरोना बाधीत व्यक्तींना मायेचा आधार द्यावा ;

नितीन बानूगडे पाटील 

 जावली शिवसेनेच्या वतीने पुनवडी ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप.

कुडाळ – जगात लाखो लोकांना कोविड १९ कोरोनाच्या महाभयंकर संकटात सापडलेल्या प्रत्येक व्यक्तीला समाजमानाने जवळ करून सहाभूतीच्या नजरेने जवळ केल्यास व त्यास माणुसकीचे दर्शन देऊन ममतेने व मायेचा आधार देणे यासाठी प्रत्येक सामाजिक घटकांचे काम असुन त्यातून मिळालेला आधारच या कोरोनाचा नायनाट करेल व सवयभान ठेवले तर कोरोनाचे उच्चाटन लवकरच होईल असे प्रतिपादन शिवसेना सातारा सांगलीचे संपर्कप्रमुख व उपनेते प्रा. नितीन बानूगडे पाटील यांनी केले. जावली तालुक्यातील कोरोनाची स्थिती वाढलेल्या पुनवडी ग्रामस्थांना जावळी तालुका शिवसेनेच्या वतीने गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांचे कडे जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करताना बानूगडे पुढे म्हणाले की तालुक्यातील मुबंईस्थित लोकांनी प्रवेश केल्याने कोरोनाच्या प्रसारात वाढ झाली असे म्हणणे चुकीचे असून लोकांनी सवयभान राखून ठेवणे व आहारात सकस आहाराचे प्रमाण वाढविल्याने तंदुरुस्त व्यक्तीला कोणत्याही प्रकारची भीती नसून समाजातील कोरोना बधितांना मानसिक व सामाजिक आधार देण्याची जबाबदारी प्रत्येक समाज बांधवांची असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. 

    यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ अध्यक्ष पदावरून बोलताना सातारा जिल्ह्याच्या तुलनेत जावली तालुक्यातील अनेक डोंगर कपारीत शिरकाव केला या ठिकाणी कंटेंमेंट झोनमुळे ऐन हंगामात लोकांना घर बाहेर पडणे मुस्कील झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडे प्रति एकरी पंचवीस हजार रुपये भरपाई मंजूर करून कोरोनाग्रस्त झालेल्या गावांना तातडीची मदत देण्याची मागणी आ. सपकाळ यांनी केली .

      शिवसेना जिल्हाप्रमुख  यशवन्त घाडगे म्हणाले की जावळी महाबळेश्वर तालुक्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात या ठिकाणी रुग्णवाहिकांचे अल्प प्रमाण असल्याने लवकरात लवकर आम्ही शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी  ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन रुग्णवाहिका बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच देणार असल्याचे सांगितले.

यावेळी महाबळेश्वर अर्बन बँकेचे अध्यक्ष बंडा उर्फ राजेश कुंभारदारे सोमनाथ काशीलकर, हणमंतराव चावरे,मोहन इंगळे, पार्टे गुरुजी, सचिन जवळ, सचिन करंजेकर उपस्थित होते मान्यवरांचे स्वागत विश्वनाथ धनावडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शांताराम तरडे यांनी मानले

( छाया:- सूर्यकांत जोशी ,कुडाळ )

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!