Skip to content

जावलीत कोरोना १३ वा बळी ,आज २३ पाँझिटीव्ह

बातमी शेयर करा :-

जावलीत कोरोनाचा  १३ वा बळी

जावलीत कोरोनाचे ग्रहण सुटता सुटेना ;आज तब्बल तेवीस जण बाधित : ४०  जणांना डिस्चार्ज ,    

एकूण ३८४, बळी १३,  डिस्चार्ज ३०४,अँक्टिव्ह ६७

  स्वयंशिस्त पाळा, कोरोना टाळा.

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्याला लागलेले कोरोनाचे ग्रहण सुटता सुटेना अशीच परिस्थिती सुरु आहे. रामवाडी, पुनवडी पाठोपाठ आता दापवडी, सायगांव व दुदुस्करवाडी कोरोनाचा हाँटस्पाँट बनले आहेत. आज तब्बल तेवीस जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. तसेच दुदुस्करवाडी येथील ७५ वर्षीय पुरुषाचा क्रांतीसिंह नानापाटील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारा दरम्यान म्रत्यू झाला आहे.  या व्यक्तीला सर्दी व ताप आल्याने चार दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आजच त्याचा कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला आहे.

          आज त्याच वेळी आज पुनवडी येथील ३८ व सायगांव येथील २ अशा तब्बल ४० जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

           लोकांनी स्वयंशिस्त व नियमांचे पालन  करावे असे आवाहन तहसीलदार शरद पाटील यांनी केले आहे.जावली तालुक्यातील स्वाबचे प्रमाण वाढवले असल्याने कोरोना बाधितांच्या आकड्यात झपाट्याने वाढ झालेली दिसत आहे. परंतु त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी मदत होणार आहे. अशी माहिती तहसिलदार पाटील यांनी दिली.

        सोमवारी निकट सहवासातील  ४७ जणांचे स्वाब तपासणीसाठी पाठवले होते त्याचा अहवाल आज मंगळवारी प्राप्त झाला.यामध्ये दुदुस्करवाडी येथील १७, दापवडी १, निपाणी मुरा २, तर तिघेजण सातारा येथील असून ते उपचारासाठी जावलीत आहेत. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांनी दिली आहे.

         दुदुस्करवाडी येथील कोरोना बाधितांचा आकडा आता  १९ झाला आहे. दापवडी १४,  व सायगांव २२ ही गावे सध्या कोरोनाच्या हिटलिस्टवर आहेत. पैकी सायगांव येथील पूर्वीच्या बाधितांनी कोरोनावर मात केलेली आहे.

कोरोना विरुद्धच्या लढ्यात लोक सहभाग वाढवावा – सयाजीराव शिंदे

     जावली तालुक्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे.या मोठ्या संग्रामात प्रशासनाकडुन अनेक त्रुटी रहात असल्यामुळे स्थानिक दक्षता समिती बरोबर अनेक गावात वाद उत्पन्न होत आहेत. हे टाळण्यासाठी तसेच जन जागृती बरोबरच कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने या लढाईत लोकसहभाग वाढवावा अशी मागणी सयाजीराव शिंदे यांनी केली आहे.

जनतेच्या सूचनांचे स्वागतच – बुद्धे

      गेले पाच महिने प्रशासन जावली तालुक्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. लोकांनी नियम न पाळल्यामुळे जावलीतील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.प्रशासन जास्तीत जास्त खबरदारी घेत असून काही त्रुटी रहात असतील किंवा काही अडचणी असतील तर याबाबत जनतेच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सूचनांचे स्वागतच केले जाईल असे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!