कोरोना जनजागृती अभियानाला जावलीकरांचा प्रतिसाद

*मी एक जबाबदार जावळीकर*
कोरोनाला हरवण्यासाठी जावली करांची वज्रमूठ
सूर्यकांत जोशी कुडाळ – गेल्या दोन महिन्यांत जावली तालुक्यातील कोरोनाच्या चढत्या आलेखा वर उपाय योजना करण्याबाबत जिवलग मित्र परिवार या व्हाट्सअप ग्रुप वर सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली होती.प्रशासनाच्या प्रयत्नांना सामाजिक स्तरातुन सहकार्य होणे अपेक्षित असल्याचे मत यामध्ये अनेकांनी व्यक्त केले होते. त्याला अनुसरून तालुक्यात जिवलग मित्र परिवारा मार्फत कोरोना जनजागृती व संदर्भात सामाजिक कार्य करण्याचे ठरले होते . त्यानुसार आज कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली .जावली करांची ही वज्रमूठ कोरोनाला नक्कीच हरवेल असा विश्वास तहसीलदार शरदपाटील यांनी व्यक्त केला.
जिवलग मित्र परिवाराच्या वतीने पहिल्या माहिती पत्रकाचे प्रकाशन तहसीलदार मा शरद पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी जिवलग मित्र परिवारातील सयाजीराव शिंदे,मेढा नगरीचे नगराध्यक्ष अनिल शिंदे,शशिकांत गुरव, सोमनाथ काशीलकर,संदीप पवार,महेश देशमुख,महेश पवार, डॉ मंगेश इंदलकर, रफिक शेख उपस्थित होते*
जीवलग मित्रचा उपक्रम स्तुत्य – तहसीलदार
जावली तालुका कोरोना मुक्त होण्यासाठी जीवलग मित्र ग्रुपच्या माध्यमातून होत असलेले सामूहिक प्रयत्न उपयोगी पडतील असे सांगून तहसीलदार शरद पाटील साहेब यांनी मी एक जबाबदार जावलीकर या संकल्पनेचे स्वागत केले .
तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्यांना बोलवून माहिती पत्रके त्यांच्या कडे सुपूर्द करण्यात येत असून आरोग्य कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून जीवलग मित्र परिवाराच्या माध्यमातून सुरु केलेल्या या अभियानाची माहिती पत्रके लोकांपर्यंत पोहचवण्यात येतील असे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी सांगितले.
जावली तालुक्यात सुरु करण्यात आलेल्या ‘मी एक जबाबदार जावलीकर ‘या अभियानाला सातारा येथील ‘सवयभान ‘चे मा राजेंद्र चोरगे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले असून मेढा येथील सोमनाथ काशीलकर साहेब यांच्या जीवनमित्र फाउंडेशनच्या वतीने दहा हजार पत्रके छापून देण्यात आली आहेत .अशीमाहिती जीवलग मित्र ग्रुपचे अँडमिन व मेढा नगरपंचायतीचे नगरसेवक शशिकांत गुरव यांनी दिली.
मा. तहसीलदार सो व गटविकास अधिकार यांनी तालुक्यातील आरोग्य विभागा प्रमाणेच ग्रामसेवक,तलाठी व कृषी खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांना सक्रिय सहभाग घेण्याच्बाबत आदेश द्यावेत अशी सूचना संदीप पवार यांनी केली आहे.
दरम्यान जीवलग मित्र परिवारा तर्फे सुरु करण्यात आलेल्या अभियानाला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्या बद्दल सयाजीराव शिंदे यांनी प्रशासनाचे आभार मानले.