Skip to content

जावली तालुक्यात दोघांचा कोरोनाने घेतला बळी

बातमी शेयर करा :-

 

आज दोन कोरोना बाधितांची भर

      कुडाळ एकूण १९/१

एकूण ४७२, डिस्चार्ज ४१४, बळी १७, अँक्टिव्ह ४१ .

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज कुडाळ येथील ७१ वर्षीय पुरुषाचा कोरोनाने बळी गेला. त्यांच्या वर सातारा येधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या म्रुत्यू पश्चात संबंधित रुग्णालयाने सदर व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे आरोग्य विभागाला कळवले.  तसेच सायगांव येथील ६८ वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी रात्री म्रुत्यु झाला आहे अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी दिली. तालुक्यात दोन दिवसात दोन   कोरोना बाधितांचा म्रुत्यु झाला आहे. तालुक्यातील कोरोना बळींची संख्या आता  १७ वर पोहचली आहे. मात्र बहुतांश रुग्णांना पूर्वीच्या आजारांचीही पार्श्वभूमी होती. असे निदर्शनास येत आहे.

मेढ्याचे हायरिस्क स्वाब निगेटिव्ह

        मेढा येथील कोरोना बाधित रुग्णांच्या हायरिस्क मधील घेतलेल्या सर्व तेहतीस जणांचे स्वाबचे अहवाल निगेटिव्ह आल्याने मेढा वासियांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

 जावलीत आणखी दोन बाधित ?

जावली तालुक्यातील मार्ली येथील २८ वर्षीय पुरुष, सरताळे येथील ३८ वर्षीय पुरुष  यांचा अहवाल कोरोना बाधित आलाअसल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिते यांनी दिली.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!