जावलीत आज तिघांचा अहवाल कोरोना बाधित

दोन जणांना डिस्चार्ज
एकूण ४७५, बळी १७, डिस्चार्ज ४१९ , अँक्टिव्ह ३९
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील दरेखुर्द येथील तिघांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. तालुक्यात आज तब्बल ५१ जणांचे स्वाब तपासणी साठी लँबला पाठवण्यात आले आहेत अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांनी दिली आहे. तालुक्यात दररोज नवीन गावात कोरोना शिरकाव करु लागल्याने लोकांनी यापुढेही अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे.
जावलीतील सरताळे गावाला कन्टेमेंट झोनचे निर्बंध लागू ; – मिनाज मुल्ला
जावली तालुक्यातील सरताळे येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार सरताळे या गावाला कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे. या गावाला महिन्यात दुसर्यांदा कन्टेंमेंट चे निर्बंध लागले आहेत.