जावलीत आज कोरोनाचा अठरावा बळी;

१२ जणांचा अहवाल कोरोना बाधित
आज कुडाळच्या पाच जणांना डिस्चार्ज
एकूण ४९२ , बळी – १८, डिस्चार्ज ४२७, अँक्टिव्ह – ४७
सूर्यकांत जोशी कुडाळ- जावली तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा आता पाचशेच्या उंबरठ्यावर आला आहे. आज मोरघर येथील एका ६५ वर्षीय व्यक्तीचा कोरोना मुळे बळी गेला. तालुक्यातील बळींचा आकडा आता अठरावर पोहचला आहे. त्याच वेळी तालुक्यात कोरोना अधिक पाय पसरत असून आज तालुक्यातील मेढा येथील दहा, सायगांव व मेढा येथील एक अशा बारा जणांचा अहवाल कोरोना बाधित असल्याचा आला आहे.तर गुरुवारी रात्री उशिरा कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.
आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये मेढा येथील ३७,४९ व ४६ वर्षीय पुरुष,७,१०,१२,१५,३३,६५ वर्षीय महिला, मोरघर येथील ४० वर्षीय व सायगांव येथील ४३ वर्षीय कोरोना बाधितांचा समावेश आहे.अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी दिली.
आज कुडाळ येथील पाच जण कोरोना वर मात करुन घरी परतले.आता पर्यंत एकूण ९ जण घरी परतले आहेत.
जावलीतील मोरघर गावाला कन्टेमेंट झोनचे निर्बंध लागू ; – मिनाज मुल्ला
जावली तालुक्यातील मोरघर येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार मोरघर या गावाला कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे. या गावाला महिन्यात दुसर्यांदा कन्टेंमेंट चे निर्बंध लागले आहेत.