Skip to content

जावलीत कोरोना बाधितांचा आकडा पाचशे पार

बातमी शेयर करा :-

स्वातंत्र्य दिन मर्यादित लोकांच्या उपस्थितीत संपन्न

जावलीत कोरोना बाधितांचा ओघ सुरुच;आज अकराजण पाँझिटीव्ह

मेढाच्या दोन जणांना डिस्चार्ज

    एकूण ५०३ , बळी १८, डिस्चार्ज ४२९ , अँक्टिव्ह ५७

 सूर्यकांत जोशी कुडाळ – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार जावली तालुक्यात स्वातंत्र्य दिन  मर्यादित लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला . मिठाई च्या दुकानांवर निर्बंध घातल्याने आज जिलेबीचे स्टाँल ही लागले नाहीत.

             जावली तालुक्यात कोरोना बाधितांच्या आकडा झपाट्याने वाढत आहे. आज कोरोना बाधितांचे पाचवे शतक पूर्ण झाले.शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात तालुक्यातील आणखी अकरा जण कोरोना बाधित आले आहेत. अशीमाहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.

           तालुक्यातील सरताळे येथील ५,नेवेकरवाडी २, पवारवाडी १, व मोरघर ३,होमगार्ड २ अशा अकरा जणांचा अहवाल कोरोना बाधित आहे.

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मेढा येथील व्यापाऱ्यांची अँन्टीजेन टेस्ट; सर्व निगेटिव्ह

          खबरदारी म्हणून जावली तालुक्यातील तलाठी २० ,

तहसील ऑफिस कर्मचारी  ११,

ग्रामसेवक ५८,पंचायत समिती कर्मचारी २५, मेढा येथील व्यापारी  ४३  ,  नगर पंचायत कर्मचारी २०, नगर पंचायत स्वच्छता कर्मचारी १५,   ग्रामीण रुग्णालय स्टाफ ६ तसेच तालुक्यातील पोलीस अधिकारी व संपूर्ण स्टाफची अँटीजेन टेस्ट  घेण्यात आली असून  सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आहे.त्यामुळे तालुक्यातील सर्व कोरोनाशी लढा देणारी यंत्रणा सुरक्षित व सज्ज आहे.

लोकांनी अधिक सतर्क रहावे – डॉ. मोहते

           गणेशोत्सव जवळ आल्याने बाजार पेठांत होणारी गर्दी टाळणे आवश्यक आहे. किंबहुना लोकांनी गर्दीत जाऊ नये.मास्क वापर आणि सोशल डिस्टेन्सींगच्या माध्यमातून कोरोनाच्या संभाव्य संसर्गा पासून स्वतः चा बचाव करावा असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी केले आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!