Skip to content

डीएमके जावली बँकेचे कर्ज बुडवण्यासाठीच संबंधिताचा आत्मदहनाचा ड्रामा. – मानकुमरे

बातमी शेयर करा :-

बँकेचे कर्ज बुडवण्यासाठीच संबंधिताचा आत्मदहनाचा ड्रामा. – मानकुमरे

 सूर्यकांत जोशी कुडाळ – ह.भ.प.दत्तात्रय महाराज कळंबे यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व सामान्य जनते बरोबरच मुंबई स्थित कष्टकरी जनतेच्या आर्थिक प्रगतीसाठी जावली सहकारी बँकेची स्थापना केली. कळंबे महाराजांच्या व जेष्ठ नेते भि.दा. भिलारे गुरूजी यांच्या आदर्श विचारांवर या बँकेचा कारभार अत्यंत पारदर्शक पणे सुरू आहे. परंतु  एका थकीत कर्जदाराने कायदेशीर होणारी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी तसेच कर्ज बुडवण्याच्या हेतूने बँकेवर निराधार व बेछुट आरोप केले आहेत.  तसेच संबंधिताने स्वातंत्र्य दिनी कुटुंबियांसह  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा केलेला ड्रामा जप्तीची कारवाई टाळण्यासाठी व कर्ज बुडवण्याच्याच हेतूने केला आहे. सबंधितावर रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार जप्तीची कारवाई करुन कर्ज वसूली केली जाईल. त्याच बरोबर बँकेची बदनामी केल्या बद्दल संबंधितावर नुकसानभरपाई चा दावा करण्यात येणार असल्याचा इशारा ह.भ.प.दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेच्या वतीने बँकेचे मार्गदर्शक व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

            बँकेच्या प्रगतीची घोडदौड वेगाने सुरू आहे. ठेवीदार व सभासदांच्या विश्वासाला कदापी तडा जाणार नाही अशी ग्वाही यावेळी संचालक मंडळाच्या वतीने देण्यात आली.

        डिएमके जावली बँकेचे ठाणे, मुंबई, पुणे, सातारा अशा विविध जिल्ह्यात कार्यक्षेत्र आहे.पारदर्शक कामकाजामुळे ठेवीदारांची बँके बाबत विश्वासार्हता आहे.सातारा जिल्हयात बँकेच्या पाच  शाखा आहेत.बँकेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील सभासदाना विविध प्रकारच्या कर्ज योजनेचा लाभ दिला जातो. मे. फ्रेंड्स कम्युनिकेशन , मे. फ्रेंड्स इंटरप्रासेस व श्री विशाल नलावडे यांनी बँकेकडून वेळोवेळी व्यवसाया साठी घेतले आहे.त्यांच्या व्यवसायातील उलाढाल व बँकेशी सुरळीत व्यवहार असल्याने त्यांना नियमानुसार व आवश्यक तारण घेऊन कर्ज पुरवठा केला आहे. परंतु मार्च  २०१९  पासून त्यांचे कर्ज थकले असून ही रक्कम व्याजासह 3 कोटी 10 लाख इतकी झाली आहे. अशी माहिती बँकेचे चेअरमन चंद्रकांत गावडे यांनी यावेळी दिली.

          संबंधित  कर्जदाला बँकेने कर्जफेडीबाबत वेळोवेळी बँकेत बोलावून वेळोवेळी समज दिली आहे. तसेच कर्जफेडीबाबत नियमानुसार असणाऱ्या सवलतींची माहिती दिली आहे. परंतु संबंधीताने कर्जफेड करण्यासाठी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

            संबंधित  कुटुंबातील सदस्यांचे आत्मदहन निवेदनाबाबतच्या चौकशीकामी बँकेने पोलीस व प्रशासनाला योग्यती  माहिती दिली आहे.यामध्ये बँकेने कर्जदारावर कोणत्याही प्रकारचे नियमबाह्य काम केलेले नाही तसेच संबंधिताच्या आरोपात तथ्य नाही हेच सिद्ध होते. संबंधिताने बँकेच्या  कर्मचाऱ्यांवर केलेले आरोप निराधार आहेत तसेच जर कोणाशी कोणताही आर्थिक व्यवहार केला असल्यास तो त्यांचा व्यक्तीगत प्रश्न असू  शकेल त्याचा बँकेशी कोणताही संबंध नाही. असे यावेळी गावडे यांनी स्पष्ट केले.

       कर्ज थकल्याने वसूली कामी बँकेने कायदेशीर कारवाई सुरू केल्याने आता हा आरोपांचा आणि आत्मदहनाचा ड्रामा सुरू करुन बँंकेची बदनामी करण्याचे षडयंत्र सुरू आहे. परंतु त्याचा बँकेच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही. त्याने जर कोणाला पैसे दिले असतील तर त्याने त्याच्यावर कारवाई करावी बँकेला बदनाम करू नये.असा इशारा यावेळी बँकेचे चेअरमन चंद्रकांत गावडे यांनी दिला.

        आता पर्यंत बँंकेच्या हिताला व महाराजांच्या नावाला  गालबोट लावणार्यांवर योग्य ती कारवाई केलेली आहे. यापुढेही बँकेच्या हिताआड येणाऱ्या कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही.       थकित कर्ज बुडवण्यासाठी सुरु असलेला खटाटोप संबंधिताने त्वरित थांबवावा .बँकेला बदनाम करु नये. त्याची बँकेबाबत काही तक्रार असेल तर समोरासमोर चर्चेची तयारी आहे. असेही या पत्रकार परिषदेत संचालक मंडळाने बँकेच्या वतीने नमूद केले.

          यावेळी पत्रकार परिषदेला बँकेचे व्हा.चेअरमन प्रकाश मस्कर,माजी चेअरमन विक्रम भिलारे, संचालक राजाराम ओंबळे,शिवाजीराव नवसरे,प्रकाश कोकरे,अँड. शिवाजीराव मर्ढेकर, मोहनराव मानकुमरे, हणमंत पवार, श्रीरंग सपकाळ, भानुदास पार्टे,माजी चेअरमन हिंदुराव तरडे उपस्थित होते.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!