
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील युवक युवती मध्ये उत्तम गुणवत्ता असून त्याला योग्य प्रशिक्षण मिळाल्यास युवकांना विविध क्रीडा प्रकारात आपले कर्तुत्व सिद्ध करण्याची संधी मिळू शकणार आहे. मुलांनी शालेय शिक्षणाबरोबरच विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेऊन आपले कौशल्य दाखवले पाहिजे. क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून युवकांना शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच आपले करिअर करण्याची ही संधी उपलब्ध होऊ शकते. असे प्रतिपादन जावली स्पोर्ट्स अकॅडमी चे संयोजक अविनाश गोंधळ यांनी केले.
जावली स्पोर्ट्स अकॅडमी कुडाळच्या माध्यमातून रायफल शूटिंग प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला सदर प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन श्री संजय सुभेदार शिंदे यांच्या हस्ते झाले. जावली स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून कराटे, बॉक्सिंग,किक बॉक्सिंग,थांगता,वू शू,युनिफाईट, क्वान की दो,स्किल दो,या मार्शल आर्ट बरोबरच रायफल शूटिंग, धावणे, सायकलिंग, ट्रेकिंग, लाठीकाठी,दानपट्टा, रोप स्किपिंग या क्रीडा प्रकारांचे मार्गदर्शन केले जाणार या खेळांचे नियम व तंत्राचे शिक्षणाबरोबरच या खेळांच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार. या उद्घाटन प्रसंगी कुडाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच सोमनाथ कदम माजी सरपंच व विद्यमान सदस्य वीरेंद्र शिंदे सदस्य दिलीप वारागडे राहुल ननावरे यांचे बरोबरच यात्रा कमिटीचे चेअरमन सुनील रासकर सदस्य उत्तम देवकर कमलाकर शेवते नंदकुमार किरवे ज्येष्ठ नागरिक संघाचे भिकू राक्षे गुरुजी आणि भाऊराव शेवते पिंपळेश्वर टेम्पो युनियनचे सदस्य मनोज सावंत,वैभव जोशी, निलेश कोळी,विकास जांभळे,पालक प्रतिनिधी अतुल भिसे,महेश कदम, प्रशिक्षक भूषण शिंदे, आसिफ शेख,पुरुषोत्तम मोहिते,प्रीती गोंधळी, अनुष्का गोंधळी, महाराजा शिवाजी हायस्कूलचे श्री घुले, दत्तात्रय तरडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुलांना क्रीडांगणाकडे वळवण्यासाठी आपण एक छोटासा प्रयत्न करीत आहोत ज्या सोयी सुविधा यापूर्वी आपल्या पिढीला मिळाल्या नाहीत त्या पुढच्या पिढीला मिळाव्यात यासाठी प्रयत्न केला जाणार अकॅडमीच्या माध्यमातून महिला आणि मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे खास वर्ग चालविले जाणार आहेत. सन 2023 मध्ये जावली स्पोर्ट्स अकॅडमी कुडाळच्या माध्यमातून कराटे व युनिफाईट मध्ये सुमारे 200 हून अधिक पदके येथील क्रीडापटूंनी मिळवली आहेत अशी माहिती यावेळी अविनाश गोंधळी यांनी दिली.
तालुकास्तरीय क्रीडा संकुलासाठी कुडाळ येथील जागा तीस वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आली आहे. मात्र आज तागायत या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम झालेले नाही. या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या जागेत जेवढे शक्य आहे तितक्या क्रीडा सुविधा उपलब्ध केल्या जाव्यात अशी मागणी ज्येष्ठ क्रीडापटू संजय शिंदे यांच्यासह ग्रामस्थ व युवकांनी केली आहे.