Tuesday, August 26, 2025
HomeTop News।।पार्थिव श्री महागणपती पूजा विधी।।

।।पार्थिव श्री महागणपती पूजा विधी।।

श्री सूर्यकांत जोशी  यांच्या सौजन्याने

पुराणोक्त प्राणप्रतिष्ठा कशी करावी याची माहिती सादर करत आहे.

        दरवर्षी गणेशोत्सवात श्री गणपती बाप्पा आपल्या घरी पाहुणे म्हणून येत असतात. बर हे पाहुणे मुक्कामी असतात. कुणाकडे दीड दिवस तर कुणाकडे पाच सात दिवस तर काही जणांकडे अनंत चतुर्दशी पर्यंत ते रहात असतात.

          घरी महत्वाचे पाहुणे येणार म्हणजे घराची साफ सफाई, रंगरंगोटी, पाहुण्यांच्या खोलीची साफसफाई याप्राथमिक तयारी बरोबरच बाप्पांच्या आगमणा दिवशी दारात सडा रांगोळी, मंगल गाणी, शहनाही, तोरणे आलीच. आपण पाहुण्यांचे  ज्या प्रमाणे स्वागत करतो .त्यांच्या राहण्याची खाण्याची व्यवस्था करतो.त्यांच्या मनोरंनासाठी व स्तुती सुमने अर्पण करण्यासाठी आरती,भक्तीगीतांनी संतुष्ट करतो त्याप्रमाणेच तर काहीसा हा उत्सव आहे. चला तर मग या आपल्या लाडक्या पाहुण्यांचे आपण यथासांग भक्ती भावाने  स्वागत व पूजन करुया.

पार्थिवगणेशपूजा प्रारंभ:-

प्रथम कपाळी तिलक धारण करून कपाळावर अक्षता चिकटवाव्यात .देवापुढे पानसुपारीचा विडा ठेवावा देवास नमस्कार करून वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि पुजेला प्रारंभ करावा.कपाळी गंध अक्षता लावण्यासाठी मंत्र.

।।चंदनस्य महत् पुण्यंम् पवित्रं पाप नाशनंम् ।।आपदांम् हरते नित्यंम लक्ष्मी तिष्ठती सर्वदा।।अक्षदा स्तुंडला शुभ्र कुंकुम् विराजित :

आचमन – 

पुढे दिलेल्या 3 नावांचा उच्चार करून उजव्या  हातावर  पळीने पाणी घेऊन प्यावे.

 ओम केशवाय नमः,ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः*

चौथ्या नावाचा उच्चार करून संध्येच्या पळीने  उजव्या हातावर पाणी घेऊन ते ताम्हणात सोडावे.*गोविंदाय नमः* 

असे दोन वेळेस करावे.* 

त्यानंतर हात जोडून खालील नावे म्हणावीत

प्रत्येक नावा पूर्वी ओम म्हणावे

*विष्णवे नमः* 

*मधुसूदनाय नमः* 

 *त्रिविक्रमाय नमः

  *वामनाय नमः* 

  *श्रीधराय नमः* 

 *ऋषिकेशाय नमः* 

   पद्मनाभाय नमः* 

*दामोदराय नमः* 

 *संकर्षणाय नमः* 

 *वासुदेवाय नमः* 

*प्रद्युम्नाय नमः* 

 *अनिरुद्धाय नमः* 

 *पुरुषोत्तमाय नमः* 

 *अधोक्षजाय नमः* 

*नारसिंहाय नमः* 

 *अच्युताय नमः* 

 *जनार्दनाय नमः* 

 *उपेन्द्राय नमः* 

*हरये नमः* 

*श्रीकृष्णाय नमः* 

 प्राणायाम करावे.

प्राणायाम प्रणवस्य परब्रह्म ऋषी : ।।परमात्मा देवता देवी गायत्री छंद  : ।।प्राणायामे विनि योग  :

गायत्री मंत्र

ओम  भूर्भव स्वाहा,  तत्स वितुर्वरण्यंम् ,भर्गो देवस्य धिमही धियो योन् प्रचोदयात.।।

आपल्या ग्राम दैवत व इष्ट देवतांचे स्मरण करावे.

*श्रीमन्महागणपतये नम:॥*

*इष्ट देवताभ्यो नमः ||*

*कुल देवताभ्यो नमः ||*

*ग्राम देवताभ्यो नमः ||*

*वास्तु देवताभ्यो नमः ||*

*सर्वेभ्यो देवेभ्यो नम:॥*

*सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः।।*

*एतत कर्मप्रधान देवताभ्यो नमः।।*

नंतर हातात अक्षता घेऊन श्रीगणेशाचे मनात स्मरण करावे आणि खालीलप्रमाणे मंत्र म्हणावेत

*प्रत्येक नावाच्या शेवटी संध्येच्या पळीने उजव्या हातावरून पळीभर पाणी ताम्हणात सोडावे.

अक्षता हातात घेऊन दोन पळ्या पाणी घेऊन खालीलप्रमाणे संकल्प म्हणावा रिकाम्या जागी आपल्या नाव गोत्राचा उच्चार करावा

*श्रीमद्भगवतो महापुरुषस्य..शालिवाहनशके शार्वरी नामसंवत्सरे, दक्षिणायने, वर्षा ऋतौ, भाद्रपद मासे, शुक्लपक्षे, चतुर्थ्यां तिथौ मंद वासरे, हस्त दिवस नक्षत्रे, कन्या  स्थिते वर्तमाने चंद्रे, सिंह स्थिते श्रीसूर्ये, धनु स्थिते श्रीदेवगुरौ, शुभपुण्यतिथौ….॥*

*मम आत्मन: परमेश्वर आज्ञारुप-पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थं………..गोत्रोत्पन्नः(स्वतःचे गोत्र म्हणावे) ……..नामक(स्वतःचे नाव म्हणावे) यजमानः अहं अस्माकं सकलकुटुंबानां सपरिवाराणां समस्त शुभफल प्राप्त्यर्थं प्रतिवार्षिक विहितं {पार्थिवसिद्धिविनायक} देवता प्रीत्यर्थं यथाज्ञानेन यथामिलित उपचार द्रव्यै: प्राणप्रतिष्ठापन पूर्वक ध्यानआवाहनादि षोडश उपचार पूजन अहं करिष्ये॥*

पाणी ताह्मणात सोडावे. पुन्हा पाणी हातात घेऊन खालीलप्रमाणे उच्चार करावा.

*आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति स्मरणं,  कलश, शंख, घंटा, दीप पूजनं च करिष्ये॥*

ताह्मणात पाणी सोडावे.नंतर श्रीगणेशाचे स्मरण करावे

*वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ।*

*निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।।*

महागणपतये नमः

सर्वोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि।।

 कलश,शंख,घंटा,दिवा समई यांची पूजा करावी गंध, अक्षता, फुले,हळद कुंकू वहावे

*कलशस्थ वरूणाय नमः*

*सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि।।*

(फूल गंध-अक्षतेमध्ये बुडवून कलशाला वहावे)

शंखाय नमः

*सर्वोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि।।*

शंखाला गंधफूल वहावे

घंटिकायै नमःआगमणार्थ देवानां ,गमणार्थ रक्षणांम्,कुरु घंटे रवंतत्र देवतानांम् ।।

*सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि।।*

(फूल गंध-अक्षतेमध्ये बुडवून घंटेला वहावे)

दीप देवताभ्यो नमः

*सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि।।*

समईला फूल गंध-अक्षतेमध्ये बुडवून वहावे

*अपवित्रःपवित्रोवा* *सर्वावस्थांगतोपिवा*

*यस्मरेत पुडरिकाक्षं*

*सबाह्याभ्यंतरःशुचिः*

कलशातील पाणी सर्व पूजा सामुग्रीवर फूलाने शिंपडावे

॥प्राणप्रतिष्ठा॥

गणपतीच्या डाव्या बाजुला (हृदयाला)आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी स्पर्श करावा व आपला डावा हात आपल्या हृदयाला स्पर्श करावा आणि पुढील मंत्र म्हणावे 

*अस्यां मृन्मयमूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोग:॥*

*॥ आं -हीं क्रों॥ अं यं रं लं वं शं षं सं हं ळं क्षं अ:॥ क्रों -हीं आं हंस: सोहं॥*

*अस्यां मूर्तौ प्राण- जीव – सर्वेंद्रियाणि वाङ् मन:त्वक् चक्षु श्रोत्र जिव्हा घ्राण पाणि पाद पायूपस्थानि इहैवागत्य सुखं चिरं तिष्ठंतु नमः॥*

*गर्भाधानादि पंचदश संस्कार सिद्ध्यर्थं पंचदश प्रणवावृती: करिष्ये॥*

आणि श्रीगणेशास स्पर्श करून मनात 15वेळा “औम” म्हणावे नंतर खालील मंत्राने श्रीगणेशाच्या नेत्रांना दूर्वाने तुप लावावे.

*अस्यै प्राणा: प्रतिष्ठंतु अस्यै प्राणा:क्षरंतु च।*

*अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन॥*

श्रीगणेशाचे  ध्यानं करावे

*एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं।*

*पाशांकुशधरं देवं ध्यायेत्सिद्धिविनायकं॥*

श्रीगणेशाच्याडोक्यावर अक्षता वहाव्यात 

*आवाहयामि विघ्नेश सुरराजार्चितेश्वर।*

*अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थं गणनायक॥*

अस्मिन पार्थिव मूर्तौ महागणपति आवाहयामी।

श्रीगणेशास अक्षता वाहून सिंहासन अर्पण करत आहोत अशी कल्पना करावी

*नानारत्न समायुक्तं कार्तस्वरविभूषितम्।*

*आसनं देवदेवेश प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम्॥*

महागणपतये नमः

आसनार्थे दूर्वांकुरं समर्पयामि।

श्रीगणेशाच्या चरणांवर दुर्वा ठेवाव्या

*पाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेमसमर्थ भो।*

*भक्त्या समर्पितं तुभ्यं लोकनाथ नमोस्तु ते॥*

महागणपतये नम

पाद्यं समर्पयामि।

गणपतिच्या पायाशी फुलाने पाणी शिंपडावे

*नमस्ते देव देवेश नमस्ते धरणीधर।*

*नमस्ते जगदाधार अर्घ्यं न: प्रतिगृह्यताम॥*

महागणपतये नमः

अर्घ्यं समर्पयामि।

श्रीगणेशाच्या चरणांवर गंध फुल अक्षता यांनी युक्त  पाणी वहावे

*कर्पूरवासितं तोयं मंदाकिन्या:समाहृतम्।*

*आचम्यतां जगन्नाथ मया दत्तं हि भक्तित:॥*

महागणपतये नमः

आचमनीयं समर्पयामि।

गणेशाच्या पायावर पाणी शिंपडावे

श्रीगणेशाच्या चरणांवर पंचामृत वहावे

महागणपतये नमः।

पंचामृत स्नानं समर्पयामि।

त्यानंतर शुद्ध पाणी शिंपडावेइ

महागणपतये नमः

शुद्धोदकं समर्पयामि।

श्रीगणेशास अक्षता वहाव्यात 

*श्रीगणेशाय नमः सुप्रतिष्ठितमस्तु॥*

श्रीगणेशास वस्त्रे वहावीत 

*सर्वभूषाधिके सौम्ये लोकलज्जानिवारणे।*

*मयोपपादिते तुभ्यं*

*वाससी प्रतिगृह्यताम्।*

श्रीगणेशास यज्ञोपवीत वहावे 

*देवदेव नमस्तेतु त्राहिमां भवसागरात्।*

*ब्रह्मसूत्रं सोत्तरीयं गृहाण परमेश्वर॥*

श्रीगणेशास गंध लावावे 

*श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरम्।*

*विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम्॥*

श्रीगणेशास अक्षता वहाव्यात *अक्षतास्तंडुला:शुभ्रा:कुंकूमेन विराजिता:।*

*मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर॥*

श्रीगणेशास हळद वहावी 

*हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी।*

*सर्वालंकारमुख्या हि देवि त्वं प्रतिगृह्यताम्॥*

श्रीगणेशास कुंकू वहावे *हरिद्राचूर्णसंयुक्तं कुंकुमं कामदायकम्।*

*वस्त्रालंकरणं सर्वं देवि त्वं प्रतिगृह्यताम्॥*

श्रीगणेशास शेंदूर वहावा *उदितारुणसंकाश जपाकुसुमसंनिभम्।*

*सीमंतभूषणार्थाय सिंदूरं प्रतिगृह्यताम्॥*

श्रीगणेशास गुलाल अबीर वहावे

*ज्योत्स्नापते नमस्तुभ्यं नमस्ते विश्वरूपिणे।*

*नानापरिमलद्रव्यं गृहाण परमेश्वर॥*

श्रीगणेशास फुले,हार,कंठी,दुर्वा  वहावे 

*माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो।*

*मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्॥*

श्रीगणेशाच्या प्रत्येक अवयवांवर किंवा डोक्यावर अक्षता वहाव्यात 

*॥अथ अंग पूजा॥*

*गणेश्वराय नम:*-पादौ पूजयामि॥(पाय)

*विघ्नराजाय नम:*-जानुनी पू०॥(गुडघे)

*आखुवाहनाय नम:*-ऊरू पू०॥(मांड्या)

*हेरंबाय नम:*-कटिं पू०॥ (कंबर)

*लंबोदराय नम:*-उदरं पू०॥ (पोट)

*गौरीसुताय नम:*-स्तनौ पू०॥(स्तन)

*गणनायकाय नम:*- हृदयं पू॥(हृदय)

*स्थूलकर्णाय नम:*-कंठं पू०॥(कंठ)

*स्कंदाग्रजाय नम:*-स्कंधौ पू०॥(खांदे)

*पाशहस्ताय नम:*-हस्तौ पू०॥(हात)

*गजवक्त्राय नम:*-वक्त्रं पू०॥(मुख)

*विघ्नहत्रे नम:*-ललाटं पू०॥(कपाळ)

*सर्वेश्वराय नम:*- शिर:पू०॥(मस्तक)

*गणाधिपाय नम:*-सर्वांगं पूजयामि॥

(सर्वांग)

श्रीगणेशास विविध पत्री अर्पण कराव्यात 

अथ पत्र पूजा:-

*सुमुखायनम:*-मालतीपत्रं समर्पयामि॥

(मधुमालती)

*गणाधिपायनम:*-भृंगराजपत्रं॥

(माका)

*उमापुत्रायनम:*-बिल्वपत्रं॥(बेल)

*गजाननायनम:*-श्वेतदूर्वापत्रं॥(पांढ-यादूर्वा)

*लंबोदरायनम:*-बदरीपत्रं॥(बोर)

*हरसूनवेनम:*-धत्तूरपत्रं॥(धोत्रा)

*गजकर्णकायनम:*-तुलसीपत्रं॥(तुळस)

*वक्रतुंडायनम:*-शमीपत्रं॥(शमी)

*गुहाग्रजायनम:*-अपामार्गपत्रं॥(आघाडा)

*एकदंतायनम:*-बृहतीपत्रं॥(डोरली)

*विकटायनम:*-करवीरपत्रं॥(कण्हेरी)

*कपिलायनम:*-अर्कपत्रं॥(मांदार)

*गजदंतायनम:*-अर्जुनपत्रं॥(अर्जुनसादडा)

*विघ्नराजायनम:*-विष्णुक्रांतापत्रं॥(विष्णुक्रांत)

*बटवेनम:*-दाडिमपत्रं॥(डाळिंब)

*सुराग्रजायनम:*-देवदारुपत्रं॥(देवदार)

*भालचंद्रायनम:*-मरुपत्रं॥(पांढरा मरवा)

*हेरंबायनम:*-अश्वत्थपत्रं॥(पिंपळ)

*चतुर्भुजायनम:*-जातीपत्रं॥(जाई)

*विनायकायनम:*-केतकीपत्रं॥(केवडा)

*सर्वेश्वरायनम:*-अगस्तिपत्रं॥(अगस्ति)

श्रीगणेशास धूप,अगरबत्ती ओवाळावी

*वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंधउत्तम:।*

*आघ्रेय:सर्वदेवानां धूपोयं प्रतिगृह्यताम्॥*

श्रीगणेशास दीप,निरांजन ओवाळावे

*आज्यंच वर्तिसंयुक्तं वह्निना योजितं मया।*

*दीपं गृहाण देवेश सर्वक्षेमसमर्थ भो:॥*

श्रीगणेशास नैवेद्य,प्रसाद समर्पण करावा 

*शर्कराखंडखाद्यानी दधिक्षीरघृतानिच।*

*आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्॥*

श्रीगणेशास विडा अर्पण करावा

*पूगीफलं महद्दिव्यं नागवल्लीदलैर्युतं।*

*कर्पूरैलासमायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम्॥*

श्रीगणेशाच्या समोरील विड्यावर दक्षिणा ठेवावी 

*हिरण्यगर्भ गर्भस्थं हेमबीजं विभावसो:।*

*अनंतपुण्यफलद मत:शातिं प्रयच्छ मे॥*

श्रीगणेशाच्या समोरील नारळावर पळीभर पाणी सोडावे आणि त्यावर एक फुल वहावे 

*इदं फलं मयादेव स्थापितं पुरतस्तव।*

*तेन मे सुफलावाप्तिर्भवेज्जन्मनि जन्मनि॥*

खालीलप्रमाणे श्रीगणेशास दोन-दोन दुर्वा वहाव्यात 

दूर्वायुग्म पूजा-

*गणाधिपायनम:*-दूर्वायुग्मं समर्पयामि॥

*उमापुत्रायनम:*-दूर्वायुग्मं ०॥

*अघनाशनायनम:*-दूर्वायुग्मं ०॥

*विनायकायनम:*-दूर्वायुग्मं ०॥

*ईशपुत्रायनम:*-दूर्वायुग्मं०॥

*सर्वसिद्धिप्रदायकायनम:*-दूर्वायुग्मं ०॥

*एकदंतायनम:*-दूर्वायुग्मं ०॥

*इभवक्त्रायनम:*-दूर्वायुग्मं ०॥

*आखुवाहनायनम:*-दूर्वायुग्मं ०॥

*कुमारगुरवेनम:*-दूर्वायुग्मं ०॥

श्रीगणेशाची आरती करावी

त्यानंतर स्वतः भोवती प्रदक्षिणा करावी

*यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च।*

*तानि तानि विनश्यंति प्रदक्षिण पदे पदे॥*

श्रीगणेशास नमस्कार करावा

*नमस्ते विघ्नसंहर्त्रे नमस्ते ईप्सितप्रद।*

*नमस्ते देवदेवेश नमस्ते गणनायक॥*

श्रीगणेशाची प्रार्थना करावी

*विनायकगणेशान सर्वदेवनमस्कृत।*

*पार्वतीप्रिय विघ्नेश मम विघ्नान्निवारय।।*

एक पळीभर पाणी ताह्मणात सोडावे

*अनेन मया यथाज्ञानेन कृत पूजनेन तेन श्रीसिद्धिविनायक:प्रीयताम्॥*

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

on