Tuesday, August 26, 2025
HomeTop Newsराजकारणाच्या मैदानाबरोबरच नामदार शिवेंद्रराजे यांची क्रिकेटच्या मैदानावरही जोरदार फटकेबाजी :कुडाळ प्रीमियर लीग...

राजकारणाच्या मैदानाबरोबरच नामदार शिवेंद्रराजे यांची क्रिकेटच्या मैदानावरही जोरदार फटकेबाजी :कुडाळ प्रीमियर लीग पर्व 2 क्रिकेट स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

के पी एल पर्व 2 च्या उद्घाटनप्रसंगी क्रिकेटपटू सोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटताना नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले. व मान्यवर ग्रामस्थ.

सूर्यकांत जोशी कुडाळ – गेली तीन दशके राजकीय मैदान यशस्वी पणे गाजवणाऱ्या नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कुडाळ प्रीमियर लीगच्या उद्घाटन प्रसंगी क्रिकेटच्या मैदानावर ही जोरदार फटकेबाजी करून क्रिकेट प्रेमींची मने जिंकली.नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले (सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर जिल्हा) यांच्या विद्यमाने, कुडाळ प्रीमियर लीग (KPL) पर्व २ रे चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेचे उद्घाटन नामदार शिवेंद्रराजेंच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार खेळाडू निर्माण व्हावेत अशी शुभेच्छा नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी दिल्या.

यावेळी कुडाळ गावचे माजी सरपंच विरेंद्र शिंदे, भाऊराव (आण्णा) शेवते, राजेंद्र शिंदे,मालोजीराव शिंदे, उपसरपंच सोमनाथ कदम, समीर आतार, राहुल ननावरे, आशिष रासकर, चंद्रकांत गवळी, सुनील रासकर, राजेश वंजारी,सागर माळेकर,समीर डांगे, अजित शिराळकर, गौरव शिंदे, दिनेश कीर्वे, ज्ञानेश्वर कुंभार,दत्तात्रय शेवते ,अनिल शेवते,धनंजय केंजळे,राक्षे गुरूजी, शब्बीर नदाफ,तोडकर फार्म,लक्ष्मण पवार,राजेंद्र वंजारी,संदीप (आबा)पवार , अतुल पवार,आनंद बंग, राहुल वारागडे, गणेश कांबळे, विठ्ठल जाधव,आफताब मणेर, नसीर डांगे, अमोल आंबुले,कुडाळ इलेवन, यात्रा कमिटी, प्रसन्ना एक्स्प्रेस न्युज,कुडाळ मधील व पंच क्रोशीमधील सर्व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.

दोन दिवस चाललेली ही स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यामध्ये अनेक लढती अटीतटीच्या व चित्त थरारक ठरल्या. सर्वच खेळाडूंनी हार व जितचा सामना अत्यंत खिलाडूपणे व संयमाने स्वीकारला. या स्पर्धेत प्पिंपळेश्वर वॉरीयर्स कुडाळ या संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले,द्वितीय पारितोषिक रुद्रा इलेवन, तृतीय पारितोषिक अजिंक्य इलेवन, चतुर्थ पारितोषिक सुभेदार योद्धा यांना मिळाले, मालिकावीर मयूर लोखंडे यास LED Tv सौजन्य – राजेश वंजारी व सागर माळेकर यांस कडुन देण्यात आले , उत्कृष्ट फलंदाज म्हणून प्रकाश मानकुंबरे यांना दिनेश कीर्वे यांसकडुन सायकल बक्षीस देण्यात आली, उत्कृष्ट गोलंदाज नितीन कुंभार यास सुनील रासकर यांस कडुन कुलर भेट देण्यात आला, उत्कृष्ट कर्णधार अभिजित ननावरे यांना अमोल आंबुले यांचे कडुन ओव्हन चे पारितोषिक देण्यात आले.

याशिवाय, विकेट हॅट्रिक सौजन्य विठ्ठल जाधव यांस कडुन मिक्सर चे मानकरी विकास रासकर, उत्कृष्ट यष्टिरक्षक श्री समर्थ यांस कडुन शुजचे मानकरी विराज कांबळे, उत्कृष्ट आयकॉन लक्ष्मी फर्निचर यांचेकडून टि-पॉय चे मानकरी देवेंद्र कदम, नवोदित खेळाडू अनिरुद्ध चरणकर यांचेकडून बॅट चे मानकरी यश वारागडे यांना देण्यात आले.

स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी क्रिकेट प्रेमींनी विविध प्रकारचे सहकार्य केले यामध्ये प्रामुख्याने You tube सौजन्य चंद्रकांत गवळी व विशाल शिंदे, पाणी सौजन्य मयंक ऍक्वा, मंडप सौजन्य इंद्रजीत शिंदे, चेंडू आणि स्टंप सौजन्य वादळ आणि रायफल ग्रुप/ मातोश्री कृषी सेवा केंद्र कुडाळ, सामनावीर टि शर्ट सौजन्य जय सदगुरू फर्निचर, मैदान सौजन्य रणजित शिराळकर, अंपायर सौजन्य नजीर मिस्त्री..‌ यांचे संयोजकांच्या वतीने मन:पुर्वक आभार मानण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

on