Tuesday, August 26, 2025
HomeTop Newsडाँ. सुरेश शेडगे यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने दु;खद निधन

डाँ. सुरेश शेडगे यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने दु;खद निधन

डाँ. सुरेश शेडगे यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने दु;खद निधन 

  सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील निष्णात डॉक्टर व राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ. सुरेश शेडगे यांचे  सोमवारी सकाळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने सातारा येथील निवास स्धानी निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्या निधना बद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.सतत हसत मुख आणि मनमोकळ्या स्वभावामुळे त्यांचा वैद्यकीय व राजकीय क्षेत्रात मोठा मित्र परिवार आहे.डाँक्टरांच्या अकस्मात निधनाने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला.जावली तालुक्यातील गणेशवाडी हे त्यांचे मूळ गाव आहे. छोट्याशा खेडेगावात जन्म घेऊन त्यांनी वैद्यकीय व्यवसायात नावलौकिक मिळवला.गेले चाळीस वर्षे ते कुडाळ येथे वैद्यकीय सेवा बजावत होते.

             वैद्यकीय,राजकीय, सामाजिक कार्यात धडाडीने काम करणारे ,तसेच  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या विचारांचे डॉ. शेडगे पाईक होते व आमदार शशिकांत शिंदे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे यांनाही त्यांनी साथ दिली.वाचनाची आवड असल्याने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध प्रकारच्या व्यासपीठावर ते अभ्यास पूर्ण व्याख्यान देत असत.

वैद्यकीय क्षेत्रात कुडाळ सह जावलीत अनेक वर्षे नितांत सेवा त्यांनी केली, तसेच राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या स्थापनेपासून सातारा जिल्हाध्यक्ष पदावर खासदार सुप्रियाताई यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कार्य करून पश्चिम महाराष्ट्रात डॉक्टर सेल वाढवण्यात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. 

          त्यांच्या निधनाबद्दल आमदार शशिकांत शिंदे, आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शोकसंदेश पाठवून कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली
    त्यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे

  2. विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली
    त्यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

on