सरताळे येथील एकाचा कोरोना पाँसिटीव्ह .
धोंडेवाडीत पूर्वीचेच रुग्ण पुन्हा बाधित :
बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांनी सतर्क राहण्याची आवश्यकता.
सूर्यकांत जोशी कुडाळ – दि.१० : जावली तालुक्यातील सरताळे येथील ५६ वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आला आहे. ही व्यक्ती रांजणी येथील कोरोना पाँसिटीव्ह व्यक्तीच्या नजीकच्या सहवासित आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांनी दिली.दरम्यान कुडाळ विभागात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
जावली तालुक्यातील धोंडेवाडी येथील बरे होऊन घरी परतलेल्या दोन कोरोना रुग्णांचा अहवाल पुन्हा कोरोना पाँसिटीव्ह निघाल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.गुरुवारी धोंडेवाडी येथे पूर्वीच्याच रुग्णाचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आला आहे. तर गेल्या आठवड्यात सुद्धा याच गावातील पूर्वीच्या रुग्णाचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आला होता .त्यामुळे या घटनेकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. विषेशतः कोरोना पाँसिटीव्ह रुग्णांनी बरे होऊन घरी परतल्यावर पंधरा दिवस होमक्वारंटाईन कालावधी काळजीपूर्वक पाळण्याची आवश्यकता आहे. तसेच त्यांच्या सहवासित जवळच्या नातेवाईकांनीही अधिक सावध राहणे आवश्यक आहे.धोंडेवाडीच्या या घटनेला जनतेने हा सूप्त इशाराच समजले पाहिजे.दरम्यान धोंडेवाडी गाव महिन्याहुन अधिक काळ कन्टेमेंट झोन मध्ये अडकल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.