Tuesday, August 26, 2025
HomeTop Newsजावलीत आणखी सोळा जणांचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह

जावलीत आणखी सोळा जणांचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह

जावलीत आणखी सोळा जणांचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह

लोकांच्या बेजबाबदार पणाने कोरोनाला आमंत्रण ;

जावली तालुका दोनशेच्या उंबरठ्यावर

 सूर्यकांत जोशी कुडाळ -जावली तालुक्यातील सोमवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात पुनवडी येथील पंधरा तर सरताळे येथील एक अशा सोळा जणांचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आला आहे।. पुनवडी येथील दोघांचे अहवाल सोमवारी सकाळी कोरोना पाँसिटीव्ह आले होते. त्यामुळे पुनवडीत एकूण कोरोना बाधितांची संख्या पंचेचाळीसवर पोहचली आहे.तर सरताळे येथे दोन रूग्ण झाले आहेत. सुदैवाने सोनगांव येथील दोन संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.यापूर्वी जून महिन्यात रामवाडीत ३२ कोरोना पाँसिटीव्ह रुग्ण आढळले होते. ५६ संशयितांचे घशातील स्त्राव पुणे येथील लँबला पाठवण्यात आले होते. जावली तालुक्यात रविवार अखेर एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या १९८  झाली आहे .जावली तालुका दोनशे कोरोना बाधितांचा आकडा पार करणार का. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

कन्टेमेंट झोन मधील लोकांवर नियंत्रण आवश्यक

        तालुक्यातील मोठ्या गावात राष्ट्रीयकृत व सहकारी बँका,पतसंस्था, दवाखाने, मेडिकल स्टोअर्स या सारख्या सेवां आहेत .त्यामुळे  प्रतिबंधित क्षेत्रातील लोक या सेवांच्या साठी सर्हास बाहेर येत आहेत. या लोकांचा तालुक्यातील मेढा , कुडाळ या सारख्या मोठ्या बाजारपेठेत  वावर दिसून येत आहे.खबरदारीचा उपाय म्हणून या मोठ्या बाजारपेठा व्यापारी व शेतकरी आर्थिक नुकसान सोसून  बंद ठेवत आहेत.तरी सुद्धा लोकांची वर्दळ अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली होत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विषेशतः कन्टेमेंट झोन मधील गावातून बाहेर येणाऱ्या लोकांवर प्रशासनाचे  नियंत्रण ठेवण्याची मागणी जनतेतून होत आहे.

 सावधान ! कोरोना नावाचा शत्रू आपल्या सभोवताली फिरत असून तो आपल्यावर कोणत्याही क्षणी प्राणघातक हल्ला करण्याची शक्यता आहे.

अत्यावश्यक कारण असेल तरच घरातून बाहेर पडा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

on