जावली तालुका कोरोना बाधितांचा आकडा ३२२/१२
दि . १७ व १८ च्या रखडलेल्या अहवालात तब्बल ४१ जण कोरोना पाँझिटीव्ह; पुनवडी १४९/२; आलेवाडी ४.
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात दि. १७ च्या अहवालात पुनवडी येथील १३ व आलेवाडी येथील ४ अशा १७ जणांचा तर दि. १८ रोजीच्या अहवालात पुनवडी येथील २० व सायगांव येथील ३ व दापवडी १ अशा २४ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.कोरोना बाधित गावात आलेवाडी या गावाचा नव्याने समावेश झाला आहे.
जावली तालुक्यात एकूण कोरोना बाधितां आकडा ३२२ वर पोहचला आहे. तालुक्यातील बारा जणांचा कोरोनाने बळी घेतला असून १४२ जण बरे होऊन घरी परतले आहेत. १७६ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत . पैकी एकट्या पुनवडी गावात कोरोना बाधितांचा आकडा १४९ वर पोहचला असून या गावातील दोघांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
प्रशासनाचे नियम न पाळण्याने व बेजबाबदार पणा केल्यास केवढी मोठी किंमत चुकवावी लागते. याचे पुनवडी व रामवाडी गावातील कोरोना हे मूर्तीमंत उदाहरण आहे. सध्याचे कोरोनाचे संकट हे जीवन व मरणातील दरी होऊन आले आहे. लग्नातील हौसेमौजे पेक्षा आणि दुख : द प्रसंगातील भावनिक गुंत्या पेक्षा सुरक्षित जगणे महत्वाचे ठरत आहे. आपल्यामुळे आपल्या स्वतः ला, कुटुंबाला व समाजाला अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेणेच शहाण पणाचे ठरणार आहे.