Tuesday, August 26, 2025
HomeTop Newsचार दिवसांपासून कोरोना अहवाल रखडल्या ने धोका

चार दिवसांपासून कोरोना अहवाल रखडल्या ने धोका

 आजचे अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त नाहीत.

चार दिवसांपासून कोरोना अहवाल रखडल्या ने धोका

 सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात पुनवडी सह अनेक गावात कोरोनाचे थैमान सुरू आहे. असे असतानाच चार दिवसांपूर्वी पाठवलेल्या स्वाबचा अहवाल अद्यापही प्राप्त होत नसल्याने धोका वाढत आहे. याबाबत जबाबदार यंत्रणेला लोकप्रतिनिधींनी जाब विचारणे आवश्यक आहे.जावली तालुक्यातील संपूर्ण जन जीवन कोरोना संक्रमणाने विस्कळित होत असतानाच हा गलथान पणा अधिक धोका वाढवत आहे.कोरोना चे अहवाल तातडीने मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलावित अशी मागणी जनतेतून होत आहे.

बाजारपेठा पुन्हा हाऊसफुल्ल

लाँकडाऊन मध्ये शिथिलता मिळताच बाजारपेठांत पुन्हा गर्दी उसळल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले. शेतातील माल विकण्यासाठी शेतकरी आणि व्यापारी मोठ्या प्रमाणात बाजारात आले. त्याच बरोबर निर्धारित वेळेत जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले.हे चित्र पाहता खरच लाँकडाऊन आवश्यक होता का.आणि त्याच्या हेतू साध्य झाला का हा प्रश्नच पडतो.

         बाजारपेठा जर नियमित सुरु राहिल्या तळ लोक गर्दी करत नाहीत. असाही अनुभव आहे. ठरावीक वेळेचे बंधन असल्याने तेवढ्या वेळेत खरेदी होण्यासाठी लोकांची गर्दी उसळत असल्याने दुकानांची  वेळ वाढवणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

 वैध कडेकोट बंद ;अवैध खुलेआम सुरु

 वारंवार होणाऱ्या लाँकडाऊन ने अनेक व्यवसाय अडचणीत

                गेल्या पाच दिवसांच्या लाँकडाऊन मध्ये वैध असणारे व्यवसाय अगदी कडेकोट बंद होते. परंतु अवैध व्यवसाय मात्र खुलेआम सुरु असल्याने सर्वसामान्य जनतेतून आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्या चार महिन्यात वेळोवेळी होणाऱ्या लाँकडाऊन मुळे केवळ व्यवसायांवर उपजिविका असणाऱ्या व्यावसायिकांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे.

         तालुक्यातील   ग्रामीण भागातील बाजारपेठे मध्ये अजुबाजुच्या खेड्यातील लोकांची वर्दळ असते. त्यामुळे त्याविभागातील कोणत्याही गावात कोरोना रुग्ण आढळल्यास खबरदारी म्हणून कोणत्याही शासकीय आदेशा शिवाय स्थानिक पातळीवर बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय वेळोवेळी  घेतला जात असतो .त्यातच  गेल्या महिनाभरात जावली तालुक्यासह संपूर्ण जिल्हयात कोरोनाने थैमान घातले आहे.त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी दहादिवस लाँकडाऊन चा आदेश जाहीर केला.त्यामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

on