एकूण ४६१ , बळी १५ , डिस्चार्ज ३८४, अँक्टिव्ह ६२
कुडाळ एकूण – १७
जावलीत आज २० डिस्चार्ज
जावलीत मेढा येथील आज तीन बाधित .
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज वीस जण कोरोना वर मात करुन घरी परतले आहेत.यामध्ये दापवडी ३, दुदुस्करवाडी १६ व रायगांव येथील १ यांचा समावेश आहे.आज बर्याच दिवसांनी जावली तालुक्यात कोरोनाने विश्रांती घेतली आहे. शुक्रवारी तालुक्यातील विविध ठिकाणच्या लोकांचे घेतलेल्या चोवीस स्वाबचे अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी दिली आहे.आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार मेढा येथील तिघांचे अँन्टीजेन टेस्ट चे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.
२ आँगष्ट पासून कुडाळ मध्ये दाखल झालेल्या कोरोनाने पाच दिवसात १७ चा आकडा गाठला. आज कुडाळ येथील सात जणांचे स्वाब घेण्यात आले असून त्याचा अहवाल उद्या रात्री पर्यंत येणार आहे. अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत वेलकर यांनी दिली आहे.
आज सकाळी आरोग्य विभाग पंचायत समिती जावली यांच्या कडुन प्रसिद्ध झालेल्या आज सकाळ अकरा पर्यंतच्या अहवाला नुसार तालुक्यात एकूण ४६१ , डिस्चार्ज ३८४ ,अँक्टिव्ह ६२ , बळी १५ अशी आहे.