Tuesday, August 26, 2025

साताराच्या खाजगी हॉस्पिटलमधून

कोरोना बाधित महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात. 

रुग्णालयावर  कारवाई करण्याची  मागणी

 सूर्यकांत जोशी कुडाळ-

माण तालुक्यातील पुसेगाव दहिवडी रस्त्यावर पांढरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या जाधववाडी गावातील एका महिलेवर साताऱ्यातील सातारा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून दमा व किडनी या रोगावर उपचार चालू असताना त्यांचे दि.६ ऑगस्ट रोजी सायंकाळी वयाच्या ७२ वर्षी निधन झाले. त्यांच्या  कोविड १९ चा स्वाब ( टेस्ट ) घेऊनही त्याचा रिपोर्ट न पाहताच रूग्णालयीन प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन हात झटकण्याचे काम केले. दि ८ ऑगस्ट रोजी रुग्णालयात कोरोनाच्या पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आणि पांढरवाडी ग्रामस्थ व नातेवाईकांना धक्काच बसला.अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही अनेक ठिकाणी घडल्या आहेत. त्यामुळे यापुढे लोकांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

      याबाबत सविस्तर माहिती अशी की लॉकडाऊन कालावधी आधीपासूनच ठाणे येथे रहिवासी असलेली सदर महिला आपल्या मूळगावी आल्यावर सोयीस्कर रित्या त्यांचे जीवन जगत होत्या दि २३ जुलै रोजी त्यांना दम्याचा व किडनीचा विकार असल्याने त्यांना उपचारार्थ   सातारा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.दि २३ ते २८ जुलै दरम्यानच्या काळात त्यांचेवर उपचार करून घरी सोडले . दि  ३ ऑगस्ट रोजी त्यांची पुनर्तपासनिस दाखल केले असता रूग्णालय प्रशासनाने त्यांना पुन्हा रूग्णालय उपचारासाठी दाखल करण्याचे सांगून त्यांचेवर दि,३,४,५ व ६ तारखेस दुपारी ३:३० पर्यन्त उपचार चालू होते. दरम्यान याठिकाणी कोविड १९ कोरोनाचा स्वाब ( टेस्ट ) घेतली व त्याच दिवशी सायंकाळी ७:३० ला त्यांचे निधन झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांना दिली असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासाठी रुग्णालयातील प्रशासनाने हालचाल सुरू केली .दि ७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता शववाहिनीतुन जाधववाडी याठिकाणी घरी व तद्नंतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . शनिवार दि. ८ रोजी दुपारी ४ वाजता सातारा हॉस्पिटलमधून संबंधित परिवारास कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याचे फोनवरून कळविण्यात आले दरम्यानच्या काळात परिवारासह सर्व गावातील लोक भयभीत झाले त्यातच माण तालुक्यातील आरोग्य अधिकारी व प्रशासन तातडीने जाधववाडी गावात दाखल करण्यात आले व आज मितीपर्यत गावातील सर्व सहवासीताचे टेस्ट स्वाब घेतल्याची माहिती मिळाली आहे

     सदर परिवाराच्या वतीने मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, व मा.राजेश टोपे आरोग्यमंत्री आणि मा. जिल्हाधिकारी सातारा यांना खालील प्रमाणे निवेदनात असे नमूद केले आहे की कोरोना कोविड १९ च्या स्वाब टेस्ट घेतल्या नंतर त्याच्या रिपोर्ट्सची वाट न पाहता तातडीने मृतदेह ताब्यात का दिला. याची चौकशी करण्यात येऊन आम्हा परिवाराच्या व गावातील नातेवाईकांना या घटनेनंतर पूर्ण हादरा बसला असून नाहक मनस्ताप करण्याची वेळ गावकरी व नातेवाईकांचे वर आली असून अशा बेजबाबदार सातारा हॉस्पिटलचे चालक मालक यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

on