३१ डिसेंबर रोजी किल्ले रायरेश्वर येथे स्वच्छ्ता मोहीम..
दिशा अकॅडमी आणि वेदांत क्लासेस मेढा यांचा अनोखा उपक्रम..!!
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : दिशा अकॅडमी आणि वेदांत क्लासेस मेढा यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ डिसेंबर निमित्त अनोखा उपक्रम राबविला अकरावी बारावी च्या विद्यार्थ्यांनी किल्ले रायरेश्वर येथे स्वच्छ्ता मोहीम अंतर्गत स्वच्छ्ता केली. त्यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे…!
विद्यार्थ्यांनी आपल्या पुढील आयुष्यात सकारात्मक ऊर्जा टिकून आयुष्य कसे योग्य मार्गावर नेता येईल यासाठी सत्य चिकाटी प्रयत्नांचा मार्ग कसा अवलंब व्हावा यासाठी शपथ देण्यात आली यावेळी दिशा अकॅडमीच्या मॅनेजिंग डायरेक्टर सौ रूपाली कदम मॅडम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले यावेळी वेदांत क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष संजय वांगडे सर संचालिका सौ. रेखा वांगडे मॅडम तसेच महेश ढेबे सर अश्विनी भिलारे मॅडम, पृथ्वीराज दळवी सर तसेच अकॅडमी चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
अकरावी बारावीच्या मुलांनी यावेळी करिअरची निर्मितीची शपथ घेतली. तर दिशा अकॅडमी आणि वेदांत क्लासेस मेढा यांचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात नक्कीच दिशादर्शक ठरणार आहे
