Tuesday, August 26, 2025
HomeTop Newsआमदार शिवेंद्रसिंहराजें नामदार होणार असल्याचे कळताच जावली तालुक्यात जल्लोष

आमदार शिवेंद्रसिंहराजें नामदार होणार असल्याचे कळताच जावली तालुक्यात जल्लोष

सूर्यकांत जोशी कुडाळ – सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंत्रिपदासाठी शपथविधीला उपस्थित राहण्याचा फोन आल्याचे कळताच जावली तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करणार. आमदार म्हणून नागपूरला जाणारे शिवेंद्रसिंहराजे भोसले परत येताना नामदार म्हणून येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण आहे. जावली तालुक्यातील मेढा कुडाळ आनेवाडी सायगाव रायगाव करहर अशा मोठ्या बाजारपेठांच्या गावात एकत्र जमून कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजी व पेढे वाटून जल्लोष साजरा केला. छोट्या-मोठ्या गावांमध्ये नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अभिनंदन आमचे बॅनर लावण्यात येत आहेत. आता जावलीतील कार्यकर्ते नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करत आहेत. आमदार बाबाराजे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा फोन आल्याचे कळताच कुडाळ बाजारपेठेत प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच करहर ता. जावली येथे भाजपाच्या वतीने पेढे वाटून व फटाके फोडून जल्लोष.करहर तालुका जावली येथे भारतीय जनता पार्टी जावली तालुका यांच्या वतीने पेढे वाटून व फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. सातारा जावली विधानसभा मतदार संघांचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मुख्यमंत्री देवेंद्रजी. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद निश्चित झाल्याचे कळताच जावळीतील कार्यकर्त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. तसेच सातारा जिल्ह्याला महायुतीने सर्वाधिक चार मंत्रिपदे मिळाल्यामुळे भारतीय जनता पार्टी जावली तालुका यांच्या वतीने करहर तालुका जावली येथे पेढे वाटून, फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला.यावेळी जावली भाजपा तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, सरचिटणीस नितीन गावडे, महूचे माजी सरपंच विठ्ठल गोळे, खादी ग्रामोद्योगचे व्हॉइस चेअरमन राजेंद्र गोळे, संचालक अशोक गोळे,चेअरमन नितीन मानकुमरे, कावडी सरपंच यशवंत मानकुमरे, अजय पाडळे, करहर सरपंच प्रदिप झेंडे,दिनकर बेलोशे, दिलीप मानकुमरे, बूथ प्रमुख महेश मानकुमरे, विकास सणस, विकास धनावडे दत्ता गोळे, मेघराज बेलोशे आदी भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.जावली तालुक्याच्या विकासाचे नवे पर्व सुरु होत असून,दुर्गम परंतु निसर्ग संपन्न असलेल्या जावली तालुक्यास पर्यटन विकासाच्या माध्यमातून नवे दालन तयार होणार असून, नवीन महाबळेश्वर सह खेडोपाडी तरुणांच्या हाताला पर्यटन विकासाच्या माध्यमातून प्रचंड रोजगार निर्माण होणार आहे.त्यामुळे जावली तालुका जगाच्या नकाशावर अग्रक्रमाणे येईल.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, ग्राहमंत्री अमितभाई शहा, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे तसेच महायुतीच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांचे आभार मानून, जिल्ह्यातील चारही मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या मंत्र्यांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

on