Tuesday, August 26, 2025
HomeTop Newsजावली तालुक्यात कोरोना शंभरीच्या उंबरठ्यावर

जावली तालुक्यात कोरोना शंभरीच्या उंबरठ्यावर

जावलीत आणखी दहा कोरोना पाँझिटीव्ह. दिवसभरात १३   रूग्ण

जावली तालुका शंभरीच्या उंबरठ्यावर

      एकूण  ९९ ,बळी ८, अँक्टिव्ह २१

सूर्यकांत जोशी कुडाळ -शुक्रवार रात्री उशीरा आलेल्या अहवाला नुसार जावली तालुक्यात रामवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष,५८ वर्षीय महिला व आखेगणी येथील ४२ वर्षीय पुरुष  अशा तिघांचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आला अशी माहिती आज सकाळी मिळाली होती. तर आज शनिवारी रात्री आत्ताच आलेल्या अहवालात रामवाडी येथील आणखी दहा लोकांचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी दिली आहे.तालुक्यात एकाच दिवशी एवढे रुग्ण आढळण्याची ही पहिली च वेळ आहे.

              रामवाडी येथील ५८ वर्षीय पुरुष दि. १८ रोजी भावाच्या रक्षा विसर्जनासाठी ठाण्याहुन सहकुटुंब आला होता. हे कुटुंब गावात होमक्वारंटाईन करण्यात आले होते. परंतु सदर व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने शासकीय रुग्णालयात दाखल करुन स्वाब घेतला असता अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आला होता . या व्यक्तीच्या निकटसहवासातील लोकांचे  संस्थात्मक विलगीकरण करण्यात येऊन स्वाब तपासणी साठी पाठवण्यात आले होते.पैकी दहा लोकांचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आला आहे.

           आज कोरोना बाधित गावात आखेगणीचा समावेश झाला आहे. तालुक्यात आता पर्यंत एकूण  रुग्ण ९९ झाली आहे. जावली तालुक्यासाठी कोरोनाची धोक्याची घंटा वाजली असून आता लोकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

on