Tuesday, August 26, 2025
HomeTop Newsजावलीत आज पाच कोरोना बाधितांची भर

जावलीत आज पाच कोरोना बाधितांची भर

जावलीत आज पाच कोरोना बाधितांची भर

एकूण ४८०, बळी १७, डिस्चार्ज ४२२, अँक्टिव्ह ४०

 सूर्यकांत जोशी कुडाळ – बुधवारी रात्रीच्या अहवालात जावली तालुक्यातील कुडाळ येथील ४६ वर्षीय महिला,५६  व २३ वर्षीय पुरुष,व नेवेकरवाडी येथील ६५  वर्षीय महिला अशा चार जणांचे अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आले आहेत. अशी माहिती  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी दिली.कुडाळ येथील बाधित तीन रुग्णां बाबत अधिक माहिती घेतली असता हे तिघे कुडाळ येथे पाहुणे येण्यासाठी निघाले होते परंतु येताना रस्त्यातच एका रुग्णाला शारिरीक त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले .त्यांची रायगांव येथील कोविड केअर सेंटरवर तपासणी केली असता त्यांचा अहवाल कोरोना बाधित आला.परंतू त्यांची कुडाळ गाव अशी नोंद असल्याने कुडाळची एकूण कोरोना बाधित संख्या १९ +3=22 होत आहे. अशी माहिती मिळली. रात्री उशिरा समजलेेे नुुसार कुुुडाळ येथील आणखी एकाचा अहवाल कोरोना बाधित आला आहे.

        तालुक्यातील ५१ जणांचे बुधवारी घशातील श्रावांचे नमूने घेऊन तपासणी साठी लँबला पाठवण्यात आले होते. परंतु त्याचा अहवाल  गुरुवारी रात्री दहा पर्यंत प्राप्त झालेला नाही.

     कुडाळकरांची घर वापसी सुरू

     बाजारपेठ सुरळीतपणे सुरू

 कुडाळ येथील आज दोन जण तर यापूर्वी दोन जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत.असे  २२ पैकी चार जणांची घरवापसी झाली आहे.कोरोनाला रोखण्यात वेळीच यश आल्याने कुडाळ बाजार पेठेतील व्यवहार आता सुरळीत सुरू झाले आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी   ७ वाजेपर्यंत सर्व दुकानांबरोबरच भाजीपाला मंडई सुरु रहात असल्याने  परिसरातील गावातील ग्राहक गर्दी न करता खरेदी करत आहेत.

जावलीतील नेवेकरवाडी गावाला कन्टेमेंट झोनचे निर्बंध लागू ; – मिनाज मुल्ला

          जावली तालुक्यातील नेवेकरवाडी येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती  व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार नेवेकरवाडी या गावाला कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत  असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे. या गावाला महिन्यात दुसर्यांदा कन्टेंमेंट चे निर्बंध लागले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

on