जावलीत आज बारा कोरोना बाधितांची भर
एकूण – ५६६, बळी १९, डिस्चार्ज ४४१, अँक्टिव्ह १०६
सूर्यकांत जोशी कुडाळ – बुधवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात जावली तालुक्यातील बारा जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. या मध्ये कुडाळ १, महिगाव ७, कुसुंबी ३,खर्शी तर्फ कुडाळ १ यांचा समावेश आहे.
जावलीतील मेढा येथील प्रभाग क्र.३ गांधीनगरला कन्टेमेंट झोनचे निर्बंध लागू ; – मिनाज मुल्ला
जावली तालुक्यातील मेढा येथील प्रभाग क्र.३ गांथीनगर भागात कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार मेढा येथील प्रभाग क्र.३ गांधीनगर कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.