केळघर, ता:२०:बोंडारवाडी धरण कृती समिती सातत्याने धरणासाठी पाठपुरावा करत असुन 17 फेब्रुवारी 2020 रोजी कृती समितीने केलेल्या चक्का जाम आंदोलनानंतर धरणाचे काम मार्गी लागेल असे वाटले होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे धरण कृती समितीला लोकशाही मार्गाचा अवलंब करून आंदोलन उभे करावे लागेल असा इशारा धरण कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. कोरोना महामारीमुळे गेली 4/5 महीने प्रशासन ठप्प आहे. त्यामुळे कृती समिती ने सुद्धा दरम्यानच्या काळात शांत रहाणं पसंत केले. आता टाळेबंदी शिथील झाली आहे. त्यामुळे आता धरणासाठी ट्रायल पीट करणे शक्य आहे. नुकतेच जिल्हाधिकारी, सातारा यांना कृती समितीने ई-मेल द्वारा पत्र पाठवले असुन संबंधितांना त्वरित ट्रायल पीट करणेबाबत आदेश देण्याची विनंती केली आहे. मात्र त्याच बरोबर 15 सप्टेंबर 2020 पर्यंत ट्रायल पीट च्या कामास सुरुवात न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.धरणाच्या ट्रायल पिट चे काम तातडीने करावे अशी मागणी कृती समितीने केली आहे.